मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Solar Energy: एकदाच खर्च करा आणि पुढची 25 वर्षं वीजबिलापासून सुटका मिळवा, पण कशी?

Solar Energy: एकदाच खर्च करा आणि पुढची 25 वर्षं वीजबिलापासून सुटका मिळवा, पण कशी?

सोलार पॅनेल

सोलार पॅनेल

Solar Energy: भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सध्या वाढत्या महागाईनं सर्वसामान्य जनतेचं बजेट बिघडलं आहे. महागाईच्या काळात थोडीशी बचतदेखील मोठा दिलासा देते. दिवसेंदिवस वीजदर वाढत आहेत; मात्र या महागड्या वीजबिलापासून कायमची सुटका होऊ शकते. त्यासाठी घरावर सोलर पॅनेल्स बसवावी लागतील. यासाठी सरकार आर्थिक मदत करतं. त्याबद्दल माहिती घेऊ या ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

घरावर सोलर प्लेट्स बसवण्यासाठी अनुदान

घराच्या छतावर सोलर पॅनेल्स लावून तुमच्या गरजेइतकी वीज तुम्ही सहज तयार करू शकता. या कामात सरकारही अर्थसाह्य करतं. सौरऊर्जेला प्रोत्साहन म्हणून सरकारकडून या कामासाठी अनुदान दिलं जातं. सर्वांत आधी तुम्हाला किती विजेची गरज आहे, याचं मूल्यमापन करावं लागेल. यावरून तुम्हाला किती क्षमतेच्या सोलर पॅनेलची गरज आहे, हे कळेल.

असा निवडा सोलर पॅनेल

घरात 2-3 पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी दिवे, पाण्याची मोटर आणि टीव्ही यांसारख्या गोष्टी असल्या, तर तुम्हाला दररोज 6 ते 8 युनिट वीज लागेल. यासाठी तुम्हाला 2 किलोवॅटचं सोलर पॅनेल लागेल. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल्स सध्याची नवीन तंत्रज्ञान असलेली सौर पॅनेल्स आहेत. यामध्ये पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण होते. 2 किलोवॅटसाठी चार सौर पॅनेल्स पुरेशी होतील.

हेही वाचा - भूक लागत नाही, भूक मंदावलीय? नक्की करून पहा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

सौर पॅनेलसाठी असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी, Sandes अ‍ॅप डाउनलोड करा. त्यावर जाऊन कशा प्रकारे नोंदणी करायची, ते जाणून घेऊ या.

- तुमचं राज्य निवडा.

- त्यानंतर तुमची वीज वितरण कंपनी निवडा.

- त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.

- मोबाइल नंबर टाका.

- ई-मेल प्रविष्ट करा.

- त्यानंतर पोर्टलच्या गाइडलाइनचं अनुसरण करा.

- ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा.

- फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.

- त्यानंतर DISCOMच्या मंजुरीची प्रतीक्षा करा. मंजुरी मिळाल्यानंतर, डिस्कॉम पॅनेलमधल्या कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल खरेदी करा.

- सोलर पॅनेल्स बसवल्यानंतर त्यांचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

- डिस्कॉमद्वारे नेट मीटर लावल्यानंतर आणि तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.

- कमिशनिंग रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक अकाउंटचा तपशील आणि कॅन्सल्ड चेक सादर करा. अनुदानाची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये 30 दिवसांच्या आत जमा होईल.

किती मिळेल सबसिडी?

भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्याकडून तुम्ही घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकता. त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी अर्ज करू शकता. रूफटॉप सोलर पॅनेल 3 किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेची बसवली, तर सरकारकडून 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळेल. याशिवाय 10 किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनेलवर 20 टक्के सबसिडी मिळेल.

हेही वाचा - PHOTOS: आता Whatsapp सिक्रेट चॅट डिलीट करण्याची गरज नाही, सोपं आहे लपवणं

सौर पॅनेलचं आयुष्य 25 वर्षं

2 किलोवॅटची सौर पॅनेल्स लावत असलात, तर त्यांची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये होईल. अशा परिस्थितीत सरकारकडून 40 टक्के सबसिडीसह तुम्हाला 72 हजार रुपयांचा खर्च होईल. या योजनेत तुम्हाला सरकारकडून 48 हजार रुपये सबसिडी मिळेल. सौर पॅनेलचं आयुष्य 25 वर्षं असते. त्यामुळे एकदा पैसे खर्च करून दीर्घ काळ वीजबिलापासून तुमची सुटका होईल. सोलर पॅनेलच्या देखभालीचा खर्च होत नसला, तरी त्याच्या बॅटरीज 10 वर्षांनी बदलाव्या लागतात.

ग्रामीण भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा कठीण काळात वीज संकटावर मात करण्यासाठी सोलर पॅनेल हा चांगला पर्याय आहे. सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकारची आर्थिक मदतही मिळते. त्यामुळे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

First published:

Tags: Technology