ट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर!

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने नवं फीचर आणलं असून यामुळे ट्रोलर्सना आळा बसणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 12:43 PM IST

ट्रोलर्सना रोखण्यासाठी ट्विटरने आणलं नवीन फीचर!

सोशल मीडियावर ट्रोलर्सना आळा घालणं कठीण आहे. यावर आता मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनं हाइड रिप्लाय फिचर आणलं आहे. या फिचरमुळे युजर्सना त्यांच्या ट्वीटवर कोणाचा रिप्लाय दिसावा आणि कोणाचा नको  हे सेट करता येणार आहे.

हाइड रिप्लाय हे ट्विटरचे नवीन प्रायव्हसी फिचर आहे. सध्या हे काही देशांमध्येच सुरु करण्यात आलं आहे. हाइड ट्विटर सुरु केल्यानंतर युजर्सजवळ पर्याय असेल की, तुमच्या पोस्टवर कोणता रिप्लाय हाइड करायचा आणि कोणता नाही.

ट्विटरचे हाइड रिप्लाय या फिचरला सुरू कऱण्यासाठी ट्विटच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Hide replies वर क्लिक केल्यानंतर आपल्याला नको तो रिप्लाय हाइड होईल. सध्या युजर्सकडे रिप्लाय बटन नेहमीसाठी हाइड करण्याचा पर्याय नाही.

ट्विटरच्या नव्या फिचरमुळे ट्रोलर्सना दणका बसणार आहे. जे ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा रिप्लाय हाइड करता येईल. यामुळे इतर लोकांना तो रिप्लाय दिसणार नाही. सध्या हे फीचर कॅनडामध्ये सुरू करण्यात आलं असेल.

ट्विटरने नुकतंच त्यांच्या डेस्कटॉप व्हर्जनच्या इंटरफेसमध्ये बदल केला आहे. ट्विटरचं डेस्कटॉप व्हर्जन आता मोबाईल अॅपप्रमाणे दिसत आहे. अजुनही काही युजर्सना हा नवीन बदल दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...