नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : स्मार्टफोन (Smartphone) प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरला आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची मोठी संख्या पाहता, अनेक कंपन्या जबरदस्त फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करत असतात. बाजारात स्मार्टफोनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फोन घेताना त्याचा प्रोसेसर, बॅटरी, कॅमेरा अशा गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एकाहून एक जबरदस्त फीचर्स असतानाही ग्राहकांची स्मार्टफोन स्लो काम करत असल्याची तक्रार असते. परंतु यामागील कारणांमागे तितकंस लक्ष दिलं जात नाही. स्मार्टफोन स्लो काम करण्यामागे, सतत हँग होण्यामागे (Smartphone Hang) असणारी काही कारणं नुकसानकारक ठरू शकतात.
रिसेट (Reset) -
कोणताही स्मार्टफोन वापरताना त्याच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी तो वेळोवेळी रिसेट करणं आवश्यक असतं. दर सहा ते सात महिन्यांनी फोन एकदा रिसेट करणं फायद्याचं ठरतं. तसंच रिसेटसह Apps cache क्लिअर करणं गरजेचं आहे. यामुळे स्मार्टफोनचा काम करण्याचा स्पीड वाढतो.
स्मार्टफोन अपडेट -
अनेकदा स्मार्टफोन वेळेत अपडेट न केल्यास, स्लो काम करतो. अपडेट केल्याने स्मार्टफोन चांगला परफॉर्मन्स देतो.
रिस्टार्ट (Restart) -
नवीन घेतलेला स्मार्टफोनही लगेचच स्लो झाला, तर रिस्टार्ट करणं फायदेशीर ठरतं. रिस्टार्ट केल्याने अँड्रॉईज सिस्टमच्या टेंपररी फाईल्स डिलीट होतात. तसंच स्मार्टफोनची मेमरीही क्लिन होते. त्यामुळे फोन स्पीडमध्ये, योग्यरित्या प्रोसेस करण्यासाठी मदत मिळते. महत्त्वाची बाब म्हणजे फोन स्विच ऑफ न करता तो रिस्टार्ट करावा.
इंटरनल स्टोरेज (Internal Storage) -
अनेकदा युजर्स संपूर्ण डेटा स्मार्टफोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करतात. त्यामुळे इंटरनल स्टोरेज भरतं आणि फोन स्लो होतो. अशा स्थितीत फोनचं इंटरनल स्टोरेज कमी केल्याने, फोन चांगल्यारितीने काम करू शकतो.
SD कार्ड -
स्मार्टफोन युजर्स अनेकदा महागडा फोन घेतात, पण त्यात स्वस्त किंवा सर्वसाधारण SD कार्ड वापरतात. त्यामुळे फोनच्या स्पीडवर परिणाम होतो. फोनमध्ये नेहमी चांगल्या स्पीडच्या SD कार्डचा वापर करणं फायद्याचं ठरतं. तसंच कोणत्याही प्रकारचा डेटा ट्रान्सफर करताना समस्या येत नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news