नवी दिल्ली, 19 मार्च : नुकतीच होळी (Holi), रंगपंचमी झाली. अनेक जण एकमेकांच्या अंगावर पाणी ओतून किंवा पाण्याने भरलेले फुगे मारून होळी साजरी करतात. होळी खेळताना बऱ्याच जणांजवळ फोन असण्याची शक्यता असते. रंग खेळल्यानंतर फोटो काढण्यासाठी किंवा म्युझिकसाठी काही जण होळी खेळतानाही फोन जवळ बाळगतात.
आजकाल बाजारात वॉटरप्रूफ फोन (Waterproof Phone) आले आहेत, पण सर्वांचे फोन वॉटरप्रूफ असतीलच असं नाही. त्यामुळे खिशात फोन असेल आणि कोणीतरी येऊन पाणी ओतलं तर तो फोन बाद झाल्यात जमा होतो. मुख्य म्हणजे पाण्यात भिजलेला फोन दुरुस्त होईल, याची खात्री कमीच असते. शिवाय फोन पाण्यामुळे खराब झाल्यास त्याच्या नुकसानीची वॉरंटीदेखील नसते. फोनला पाण्यापासून वाचवण्यासाठी झिपलॉक पाऊचमध्ये ठेवणं हा सर्वात सोपा उपाय आहे. परंतु फोन पाण्यात भिजला असेल, काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात.
फोन पाण्यात भिजल्यानंतर लगेच खालील स्टेप्स फॉलो करा -
- तुमचा स्मार्टफोन (Smartphone) पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तो डिव्हाइस तातडीने स्विच ऑफ (Switch off the Device Immediately) करा. त्यातलं पाणी काढून टाकण्यासाठी प्रोटेक्टिव्ह स्क्रीन कव्हर (Protective Screen Cover) आणि चार्जिंग केस (Charging Case) काढून टाका.
- त्यानंतर फोनमध्ये बॅक कव्हर आणि इतर भागांमधून पाणी काढा. कोरड्या कापडाने फोन पुसून घ्या. यासाठी तुम्ही कापूसदेखील वापरू शकता.
- स्मार्टफोन भिजल्यानंतर त्याला जोरात हलवू नका. कारण पोर्ट आणि गॅपमधून पाणी बाहेर येण्याऐवजी आतदेखील जाऊ शकतं. शिवाय फोन भिजल्यानंतर लगेच सिम कार्ड (SIM card) बाहेर काढायला विसरू नका.
- त्यातील पाण्याचं बाष्पीभवन होऊ देण्यासाठी स्मार्टफोनला काही तास बंद करून एका बॅगमध्ये ठेवा. तुम्ही फोन कमीतकमी सहा तासांसाठी एका बॅगमध्ये ठेवल्यास फोन पुन्हा चांगला होण्याची शक्यता वाढते.
- भिजलेल्या फोनमधील पाणी काढण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर वापरु नका. कारण हेअर ड्रायरमुळे फोनची स्क्रीन खराब होऊ शकते, शिवाय त्यामुळे पाणी फोनच्या बाहेर निघण्याऐवजी आत देखील जाऊ शकतं.
- सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोनमध्ये पाणी गेल्यानंतर वरील सर्व प्रक्रियेदरम्यान, स्मार्टफोन चार्ज करू नका (Do Not Charge Smartphone). यामुळे शॉर्ट सर्किट (Short Circuit) होऊ शकतं आणि इलेक्ट्रिक शॉकचा धोका (Electric Shock Risk) देखील असतो. होळी-रंगपंचमीला स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास युजर्स वरील गोष्टी करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news