मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा जुना Smartphone केवळ 100 रुपयांत होईल नवा! वापरा ही ट्रिक

तुमचा जुना Smartphone केवळ 100 रुपयांत होईल नवा! वापरा ही ट्रिक

Smartphone Tips and Tricks: जर तुमचा स्मार्टफोन जुना आणि खराब दिसत असेल. पण, काही कारणास्तव तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, जी 100 रुपयांमध्ये तुमचा फोन नवीन बनवेल.

Smartphone Tips and Tricks: जर तुमचा स्मार्टफोन जुना आणि खराब दिसत असेल. पण, काही कारणास्तव तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, जी 100 रुपयांमध्ये तुमचा फोन नवीन बनवेल.

Smartphone Tips and Tricks: जर तुमचा स्मार्टफोन जुना आणि खराब दिसत असेल. पण, काही कारणास्तव तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, जी 100 रुपयांमध्ये तुमचा फोन नवीन बनवेल.

मुंबई, 1 एप्रिल : स्मार्टफोन (Smartphone) ही सध्याच्या काळातील अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. आजकाल स्मार्टफोन नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. सर्वांकडेच स्मार्टफोन आहे आणि त्याचा उपयोगदेखील प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये बदलत्या काळासोबत अनेक नवनवी फीचर्स वाढत जात आहेत; मात्र स्मार्टफोनच्या किमतीदेखील जास्त असतात. त्यामुळे दर थोड्या थोड्या दिवसांनी नवी मॉडेल्स बाजारात येत असली, तरी ती खरेदी करणं तेवढं सोपं नाही. महागाईच्या काळात एक चांगला आणि सर्व फीचर्सयुक्त स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे अनेक जण आपला जुना फोन बरेच दिवस वापरणेच योग्य मानतात. परंतु अनेक ट्रिक्सचा (Tricks) वापर करून तुमचा जुना स्मार्टफोन नवा आणि करता येऊ शकतो. आज आम्ही याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहोत.

आपला स्मार्टफोन कायम नवीन दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग त्यासाठी फोनवर वेगवेगळ्या डिझाइनचे, रंगांचे, वेगवेगळ्या आकारांचे कव्हर (Mobile Cover) बसवले जातात. यामुळे तुमचा फोन नवीन दिसतो. फोटो वापरून तयार केलेलं कव्हरही आपल्या स्मार्टफोनचा लूक वाढवतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन 100 ते 200 रुपयांमध्ये नवा दिसू लागेल. सध्या बाजारात एक नवीन 'स्मार्टफोन स्किन' आली आहे. स्मार्टफोन स्किन ही एक विशेष प्रकारची स्किन असून, फोनवर सहजपणे पेस्ट केली जाऊ शकते. त्याची किंमत 100 ते 200 रुपयांच्या दरम्यान आहे. तुमच्या जवळच्या मोबाइल रिपेअर शॉपमध्ये जाऊन ही स्किन फोनवर पेस्ट करून घेऊ शकता.

OnePlus चा 'हा' स्मार्टफोन आज होणार लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

तुमचा स्मार्टफोनचा वापर रफ असेल आणि तुम्हाला त्याला धूळ, पाणी आणि इतर प्रदूषणापासून वाचवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या स्किनचा उपयोग होऊ शकतो. या स्किनमुळे तुमच्या स्मार्टफोनचं स्वरूप आणि डिझाइन पूर्णपणे बदलेल. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन तुमच्या फोनमध्ये धूळ आणि माती जाऊ देणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनची लाइफ आपसूकच वाढेल. याशिवाय तुमचा स्मार्टफोन वॉटरप्रूफ नसेल आणि तुम्हाला त्याला पाण्यापासूनदेखील सुरक्षित ठेवायचं असलं, तर ही स्किन तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ही स्मार्टफोन स्किन तुमच्या फोनमध्ये पाणी जाऊ देणार नाही. त्याचबरोबर या स्किनचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे ही लाँग लास्टिंग असते. म्हणजेच ही स्मार्टफोन स्किन जास्त काळ तुमच्या फोनवर टिकून राहते. तुम्ही स्वतः हाताने काढून टाकेपर्यंत ती तुमच्या फोनचे रक्षण करते. अशा प्रकारे ही स्मार्टफोन स्किन वापरून तुमचा स्मार्टफोन कमी खर्चात अगदी नवीन बनवू शकता.

First published:

Tags: Mobile, Smartphone