नवी दिल्ली, 25 एप्रिल : टेक्नोलॉजीमध्ये सतत नवनवीन संशोधन होत आहे. जगभरात अनेक थक्क करणाऱ्या अनोख्या आणि नव्या टेक्नोलॉजीची निर्मिती होत असते. Sony कंपनीने अशाच एका आश्चर्यकारक टेक्नोलॉजीची निर्मिती केली आहे. लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करुन कंपन्यांनी पोर्टेबल आणि वियरेबल्स डिव्हाईसची निर्मिती केली होती. आता सोनीने वियरेबल्स AC लॉन्च करुन रेकॉर्ड केला आहे. सोनीने तयार केलेला हा वियरेबल्स AC एका मोबाईल फोनहूनही छोटा आहे, जो आपल्यासोबत कुठेही घेऊन जाता येऊ शकतो.
हा एसी मोबाईल App ने कंट्रोल करता येतो. कंपनीने हा वियरेबल्स AC मागील वर्षी लाँच केला होता, ज्याला Reon Pocket नाव देण्यात आलं होतं. या Reon Pocket 2 ची जपानमध्ये किंमत 138 डॉलर आहे, जवळपास 14,850 भारतीय रुपये आहे. भारतात याच्या लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
The Verge च्या रिपोर्टनुसार, Sony चा हा वियरेबल्स AC सिंगल चार्जमध्ये अनेक तास वापरला जाऊ शकतो. Reon Pocket 2 चं डिझाईन Reon Pocket शी मिळतं-जुळतं आहे. आधीच्या तुलनेत या वियरेबल्स AC मध्ये दोन पटीने अधिक हीट शोषून तापमान कमी करण्याची क्षमता आहे. म्हणजेच कुलिंगच्या तुलनेत हा आधीच्या मॉडेलपेक्षा अधिक पॉवरफुल आहे.
Sony चा हा नवा वियरेबल्स AC नेकबॅकप्रमाणे गळ्यात घालता येतो. आधीच्या मॉडेलमध्ये एका खास टी-शर्टसह गळ्यात घालावा लागत होता. मात्र या नव्या Reon Pocket 2 मध्ये खास टी-शर्टची गरज लागणार नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत स्पोर्ट्सची खास आवड असलेले लोक याचा वापर करू शकतात. याचा वापर आउटडोर खेळ क्रिकेट, फुटबॉल आणि इतर खेळ खेळताना केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news