मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /मोबाइल नेटवर्क वारंवार जात आहे? आजच घरी आणा ‘हे’ डिव्हाइस

मोबाइल नेटवर्क वारंवार जात आहे? आजच घरी आणा ‘हे’ डिव्हाइस

Smartphone Signal Boosting

Smartphone Signal Boosting

तुम्हाला देखील घरामध्ये मोबाइल नेटवर्कची समस्या येत असल्यास एक खास डिव्हाइस तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 18 मार्च :  सध्याच्या जीवनात स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग झालाय! स्मार्टफोनमध्ये नेटवर्क नसल्यावर मोठी समस्या निर्माण होते. महत्त्वाचा कॉल करायचा असतो, अशा वेळी अचानक फोनमधलं नेटवर्क गायब होतं. नेटवर्क नसल्याने इंटरनेटदेखील वापरता येत नाही. यामुळे चॅटिंग, सोशल मीडियाचा वापर करता येत नाही. अनेकदा शहरातदेखील मोबाइल नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्हालादेखील घरामध्ये मोबाइल नेटवर्कची समस्या येत असल्यास एक खास डिव्हाइस तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकतं. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

    मार्केटमध्ये असं एक डिव्हाइस आहे, जे एका झटक्यात स्मार्टफोनच्या नेटवर्कची समस्या दूर करील व तुम्ही हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल. कॉल ड्रॉपशिवाय कॉलिंग करू शकता. हे डिव्हाइस खूपच उपयोगी असून या डिव्हाइसचं नाव ‘नेटवर्क बूस्टर डिव्हाइस’ असं आहे. तुम्हालाही घरात मोबाइल नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर आजच तुम्ही हे डिव्हाइस खरेदी करून ही समस्या दूर करू शकता. चला तर, या डिव्हाइसची किंमत किती आहे, त्याचा वापर कसा करता येतो, हे जाणून घेऊ या.

    बाथरूम, वॉशरूम,रेस्ट रूम आणि टॉयलेट यामध्ये फरक काय?

    किंमत किती?

    नेटवर्क बूस्टर डिव्हाइस बाजारात वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आणि वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध असतं. तुम्ही ते तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या घराच्या क्षेत्रानुसार खरेदी करू शकता. नेटवर्क जास्त अंतरावर वाढवायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. या डिव्हाइसची किंमत सुमारे 3000 रुपयांपासून सुरू होते. 10 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत किमतीची डिव्हाइसही उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या घरात इंटरनेटचा हाय स्पीड हवा असेल किंवा कॉलिंग चांगल्या प्रकारे करायचं असेल, तर हे डिव्हाइस खूप उपयोगी ठरू शकतं.

    असा करा वापर

    तुम्हाला हे डिव्हाइस घरी बसवावं लागेल, त्यानंतर हे डिव्हाइस एका झटक्यात तुमच्या घरामध्ये असणाऱ्या नेटवर्कचा वेग वाढवेल आणि यामुळे तुम्ही हाय स्पीडने इंटरनेट वापरू शकता. कोणत्याही व्यत्ययाशिवाय कॉल करू शकता, इंटरनेटवर व्हिडिओ पाहू शकता. फोनवर नेटवर्कच्या अडथळ्याशिवाय बोलू शकता.

    घरबसल्या पूर्ण सिग्नल मिळवण्यासाठी तुम्ही बाजारातून नेटवर्क बूस्टर डिव्हाइस खरेदी करू शकता. हे डिव्हाइस इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही घराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन कॉल करू शकाल आणि इंटरनेटदेखील वापरू शकाल.

    First published:

    Tags: Technology