नवी दिल्ली, 13 जून : अनेकदा आपला स्मार्टफोन (Smartphone) स्लो होतो. फोन स्लो होण्याचं प्रमुख कारण स्पेस, स्टोरेज फुल होणं हे आहे. जर तुमच्या फोनचं स्टोरेज पूर्णपणे भरलं असेल, तर तो सतत हँग होत, स्लो होईल. अनेकदा फोनमध्ये अशा अनेक गोष्टी स्टोर असतात, ज्याबाबत आपल्याला अजिबात माहिती नसते. या नको असलेल्या, माहिती नसलेल्या अनेक गोष्टींमुळे फोनची स्पेस फुल होते.
फोन हँग होऊ नये, स्लो होऊ नये यासाठी कमीत-कमी आठवड्यातून एकदा तरी फोन स्पेसची साफसफाई करणं गरजेचं आहे. त्याशिवाय मोबाईल अपडेट आल्यानंतर, ते सिस्टमही अपडेट करावं.
फोन स्पेस -
एखादं अॅप डाउनलोड केल्यानंतर, त्याचा उपयोग झाल्यानंतर ते नको असल्यास डिलीट करा. उपयोगी नसलेले अॅप ठेवल्याने उगाच स्पेस भरते. ज्या अॅपचा मोबाईलमध्ये वापर होतो, ते अॅप नीट सिक्वेंसमध्ये ठेवा.
फ्री स्टोरेज -
अनेक नव्या मोबाईलमध्ये स्टोरेजसाठी मोठी स्पेस मिळते. पण भरपूर स्पेस असली, तरी जे काही फोनमध्ये डाउनलोड होतं, ते सर्वच सेव्ह झाल्याने स्पेस कमी पडते. त्यामुळे नको असलेले मेसेज, GIF, गेम, व्हिडीओ, फोटो लगेच डिलीट करा. यामुळे स्पेस मिळाल्याने मोबाईल सहजपणे ऑपरेट होईल. अनेक मोठ्या फाईल्सही फोनमध्ये डाउनलोड होतात, ज्याची गरज नाही, त्या काम झाल्यानंतर डिलीट करा.
तुमच्या फोनमध्ये अशी सेटिंग ठेऊ शकता, की एखादा मेसेज किंवा व्हिडीओ किती वेळ ठेवावा. त्याचा टाईम संपल्यानंतर ते डिलीट होईल.
सर्वात मोठं स्टोरेज फोटो आणि व्हिडीओचं असतं. महत्त्वाचे, खास व्हिडीओ-फोटो तुम्ही ऑनलाईन क्लाउड बॅकअपमध्ये ठेऊ शकता. त्यानंतर फोनमधून डिलीट करू शकता. बॅकअप ठेवल्याने ते फोटो, व्हिडीओ कधीही मिळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.