नवी दिल्ली, 15 जानेवारी : बजेट स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतात एका जबरदस्त ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत स्मार्टफोसह Snokor iRocker TWS Earbuds केवळ एका रुपयात खरेदी करता येणार आहेत. Infinix Days sale मध्ये ही ऑफर देण्यात आली आहे.
14 ते 16 जानेवारीपर्यंत सुरू असणाऱ्या Infinix Days sale मध्ये ग्राहक Snokor iRocker TWS ईयरबड्स अवघ्या एक रुपयात खरेदी करू शकतात. जे ग्राहक या सेल कालावधीत Infinix Hot 9, Infinix Note 7 आणि Infinix Hot 9 Pro स्मार्टफोन खरेदी करतील, त्यांच्यासाठी ही ऑफर आहे.
जर ग्राहकांनी इनफिनिक्सच्या या तीन स्मार्टफोनपैकी कोणताही एक स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर खरेदी केल्यास, फोनच्या डिलिव्हरीनंतर फ्लिपकार्टवर Infinix Snokor iRocker ची किंमत केवळ एक रुपये दिसते. हे त्याच ग्राहकांना दिसेल, ज्यांनी 14 ते 16 जानेवारी दरम्यान, इनफिनिक्सच्या तीन फोनपैकी एकाची खरेदी केली आहे. सध्या भारतात Snokor iRocker ची किंमत 1499 रुपये इतकी आहे.
भारतात Infinix बजेट स्मार्टफोन Infinix Hot 9 ची किंमत 9,499 रुपये, Infinix Hot 9 Pro ची किंमत 10,499 रुपये आणि Infinix Note 7 ची किंमत 10,999 रुपये आहे.
ही ऑफर स्मार्टफोन डिलिव्हर झाल्यानंतर उपलब्ध होणार आहे. ज्याचा वापर युजर्स Flipkart अकाउंटवर जाऊन 10 दिवसांच्या आत करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Flipkart, Smartphone