तुम्हीही स्मार्टफोन वापरता का? 'या' कंपन्या कॅन्सरला कारणीभूत असल्याचा आरोप!

तुम्हीही स्मार्टफोन वापरता का? 'या' कंपन्या कॅन्सरला कारणीभूत असल्याचा आरोप!

तुम्ही हातात स्मार्टफोन नाही तर भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देणारं डिव्हाईस घेऊन फिरत आहात.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 26 ऑगस्ट : सध्या प्रत्येकालाच स्मार्टफोनचं व्यसन लागलं आहे. मोबाईलचा जास्त वापर शरिरासाठी घातक असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. आता दोन मोठ्या स्मार्ट फोन कंपन्यांविरोधात अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला आहे. अॅपल आणि सॅमसंग या कंपन्यांवर आरोप करण्यात आला आहे की, स्मार्टफोनमधून धोकादायक अशी रेडिओ लहरी निघतात. या लहरी युजर्ससाठी हानिकारक ठरू शकतात.

कॅलिफोर्नियातील एका न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून सॅमसंग आणि अॅपल या कंपन्या स्मार्टफोन फेडरल कम्युनिकेशन कमिशनद्वारे घालण्यात आलेल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. स्मार्टफोनच्या काही डिव्हाईसची नावेही घेण्यात आली होती. यामध्ये अॅपल आयफोन 7 प्लस, 8, X, सॅमसंग गॅलेक्स एस8, गॅलेक्सी नोट 8 या फोनचा समावेश आहे.

दोन्ही कंपन्यांच्या मोबाईलच्या रेडिओ लहरींची तपासणी करण्यात आली. यात आयफोन 7 मधून मर्यादेपेक्षा जास्त लहरी बाहेर पडत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय अॅपल कंपनीकडूनसुद्धा या डिव्हाईसमधुन मर्यादेपेक्षा दुप्पट लहरी बाहेर पडत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

स्मार्टफोनमधून घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त लहरी बाहेर पडणं शरिराला धोकादायक आहे. यामुळं स्मार्टफोन वापरणाऱ्यांना कर्करोग, मानसिक रोगाशिवाय गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं असं या याचिकेत म्हटलं आहे.

अॅपलने उत्तर देताना म्हटलं आहे की, आयफोन 7 सह सर्व डिव्हाईस एफसीसी प्रमाणित आहेत. याशिवाय ज्या देशांत आयफोनची विक्री होते त्या देशांनीही प्रमाणपत्र दिलं आहे. आम्ही सर्व नियम आणि मर्यादांचे पालन करण्यासाठी बांधिल आहोत असं म्हटलं आहे. अॅपलनं त्यांची प्रतिक्रिया दिली असली तरी सॅमसंगकडून यावर कोणतंही उत्तर आलेलं नाही.

सावधान! तुम्ही भेसळयुक्त स्कॉच पिताय? पाहा SPECIAL REPORT

Published by: Suraj Yadav
First published: August 26, 2019, 1:27 PM IST
Tags: smartphone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading