Home /News /technology /

मोबाइलसह आता चार्जर देत नाहीयेत काही कंपन्या, जुन्या Charger ने फोन चार्ज करणं योग्य ठरेल का?

मोबाइलसह आता चार्जर देत नाहीयेत काही कंपन्या, जुन्या Charger ने फोन चार्ज करणं योग्य ठरेल का?

आजकाल काही स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर येत नाही. आयफोन 13 ( iPhone 13 ) सीरीज आणि सॅमसंग एस सीरीजचा स्मार्टफोन खरेदी केल्यावर त्याच्या बॉक्समध्ये चार्जर येत नाही. अशावेळी तुमच्याकडे असणारा जुना चार्जर वापरला तर ते योग्य ठरेल का?

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 28 जानेवारी:  स्मार्टफोनचं चार्जिंग संपायला लागलं असेल तर लगेचच आपली चार्जर शोधायला सुरुवात होते. ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यासाठी बऱ्याचवेळा तुम्ही सहकाऱ्यांकडून चार्जर घेत असाल. तर काहीवेळा स्वतःच्या स्मार्टफोनचे चार्जर लवकर सापडत नसल्यामुळे घरामधील इतर कुणाच्या फोनचा चार्जर तुम्ही वापरला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, स्मार्टफोन चार्जिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? आज आम्ही तुम्हाला ही माहिती देणार आहोत. स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढत आहे. बऱ्याच जणांचा दिवसातील बहुतांश वेळ स्मार्टफोनमध्ये जातो. अशावेळी फोनची बॅटरी जास्त काळ चालत नाही. त्यामुळे अनेकजण त्यांचा स्मार्टफोन कोणत्याही चार्जरने चार्ज करतात. पण ते बरोबर आहे का? आजकाल काही स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये चार्जर येत नाही. आयफोन 13 (iPhone 13) सीरीज आणि सॅमसंग (Samsung New Phone) एस सीरीजचा स्मार्टफोन खरेदी केल्यावर त्याच्या बॉक्समध्ये चार्जर येत नाही. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या फ्लॅगशिप फोनसह चार्जर देत नाहीत. अशावेळी नवीन स्मार्टफोन घरात असणाऱ्या दुसऱ्या चार्जरने चार्ज करता येईल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. आज आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा सर्व गोंधळ दूर होऊ शकतो. हे वाचा-Xiaomiची नवी सीरिज लाँच;पाहा Redmi Note 11, Note 11S आणि Note 11 Pro किंमत-फीचर अनेकदा असे दिसून येते की, लोक त्यांचा फोन दुसर्‍या फोनच्या चार्जरने चार्ज करतात आणि म्हणतात फोन खूपच हळू चार्ज होतो. पण हे नेहमी लक्षात ठेवा की, तुम्ही स्मार्टफोन खरेदी करताना फोनच्या बॉक्समध्ये जो चार्जर आला होता, तोच चार्जर तुमचा स्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी चांगला आहे. समजा तुमचा फोन 20 वॅट चार्जिंगला सपोर्ट करत असेल, तर तो 120 वॅट किंवा 65 वॅट क्षमतेच्या चार्जरने तेवढ्याच वेळेत चार्ज होईल, जेवढा वेळ त्याला तुमच्या फोनच्या चार्जरने चार्ज होण्यास लागतो. कारण कंपनीने तो फोनच 20 वॅट पर्यंतच्या चार्जिंग सपोर्टनुसार तयार केला आहे. फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे फोनची बॅटरी लवकर चार्ज करता येते. पण त्याचे काही तोटेही आहेत. फास्ट चार्जिंगमुळे बॅटरीचे तापमान वाढते आणि बॅटरीची लाइफ कमी होते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक कंपन्या स्मार्टफोनमध्ये दोन बॅटऱ्या बसवत आहेत. दोन बॅटरी असलेले स्मार्टफोन बाजारात आले आहेत, ज्यात Xiaomi 11i हायपरचार्ज, Xiaomi 11i, OnePlus 9 Pro आणि Samsung Galaxy Z Fold यांचा समावेश आहे. हे लक्षात ठेवा जर तुम्ही असा स्मार्टफोन घेतला असेल, ज्यामध्ये कंपनी चार्जर देत नसेल, तर कंपनीने सुचवलेल्या क्षमतेचा चार्जर खरेदी करा. कारण त्याच चार्जरने तुम्ही फोन योग्य प्रकारे चार्ज करू शकाल. जर तुमचा चार्जर खराब झाला असेल किंवा तुटला असेल तर त्याच कंपनीचा किंवा चांगल्या कंपनीचा चार्जर खरेदी करा. कारण लोकल चार्जरमुळे फोन नीट चार्ज होत नाही आणि पुन्हा पुन्हा चार्ज करावा लागतो. हे वाचा-PVC Aadhaar मागवणं आता आणखी सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं Card स्पार्टफोन्सचे चार्जरदेखील आजकाल खूप प्रगत झाले आहेत. नवीन चार्जिंग तंत्रज्ञान असेलेल हे चार्जर सामान्य चार्जरच्या तुलनेत महाग असतात. पण स्मार्टफोन चार्जिंग करताना तो फोन खरेदी करताना बॉक्समध्ये आलेला चार्जर वापरणे केव्हाही फायद्याचे ठरते. अर्थात ज्या फोनसोबत चार्जर येत नाही, त्यांनी मात्र कंपनीने सुचवलेल्या क्षमतेचा चार्जर खरेदी करणे चांगले.
First published:

Tags: Mobile, Mobile Phone

पुढील बातम्या