मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone कसं ठरवतो युजरला स्क्रिनवर कधी Brightness ची गरज आहे आणि कधी नाही?

Smartphone कसं ठरवतो युजरला स्क्रिनवर कधी Brightness ची गरज आहे आणि कधी नाही?

स्मार्टफोनमध्ये युजरच्या सुरक्षेच्यादृष्टीने अनेक बदल केले गेले. यातलाच सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचा बदल म्हणजे ऑटो ब्राइटनेस फीचर (Auto Brightness Feature). पण हे ऑटो ब्राइटनेस फीचर कसं काम करतं?

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : स्मार्टफोनमध्ये (Smartphone) काळानुसार अनेक बदल झाले. जवळपास सततच स्मार्टफोन लोकांच्या वापरात असतो. दिवस-रात्र याचा वापर होत असल्याने स्मार्टफोनमध्ये युजरच्या सुरक्षेच्यादृष्टीने अनेक बदल केले गेले. यातलाच सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचा बदल म्हणजे ऑटो ब्राइटनेस फीचर (Auto Brightness Feature). युजरच्या मोबाइल स्क्रिनचा ब्राइटनेस (Mobile Screen Brightness) कधी वाढवायचा आणि कधी कमी करायचा हे काम या फीचरमुळे केलं जातं. हे फीचर अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्ही प्लॅटफॉर्म डिव्हाइसवर आहे. पण हे ऑटो ब्राइटनेस फीचर कसं काम करतं?

मोबाइल वापरताना आपण घरातून बाहेर गेला किंवा उन्हात, लख्ख प्रकाशात गेलो, तर फोनच्या स्क्रिनचा ब्राइटनेस वाढतो. त्यानंतर रात्रीच्या वेळी स्क्रिनचा ब्राइटनेस कमी होतो. हे ऑटो ब्राइटनेस फीचरमुळे होतं. जर तुम्ही या ऑटो फीचरचा वापर करत असाल, तर तुम्हाला मॅन्युअली ब्राइटनेस कमी-जास्त करावा लागत नाही. पिक्सल आणि सॅमसंगने काही फोनमध्ये अॅडॅप्टिव्ह ब्राइटनेस फीचर दिलं आहे. जे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या (AI) मदतीने ब्राइटनेसला अॅडजस्ट करतो.

हे वाचा - Photography ची आवड असेल तर 'हे' 108MP चे स्मार्टफोन्स ठरतील Best, काय आहे किंमत

Smartphone कसं ओळखतो ब्राइटनेस कधी वाढवायचा आणि कमी कमी करायचा?

गॅजेट्स नॉउच्या रिपोर्टनुसार, स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे सेंसर्स लावलेले असतात. प्रॉक्सिमिटी सेंसर, गायरोस्कोप आणि बॅरोमीटर्स असे अनेक सेंसर्स असतात. यापैकीच एक म्हणजे एम्बिएंट लाइट सेंसर. याच सेंसरच्या मदतीने हे फीचर काम करतं.

हे वाचा - सावधान! तुम्हाला 'ही' लक्षणं तर जाणवत नाहीत ना? स्मार्टफोन्सचा अतिवापर धोकादायक

स्मार्टफोनचं हे एम्बिएंट लाइट सेंसर मोबाइलच्या जवळपास कधी लाइट आणि आणि कधी नाही हे ओळखण्यास सक्षम असतं. हे एका कॅमेराप्रमाणे काम करतं. हे मोबाइलच्या जवळपास असणाऱ्या लाइटला कॅल्युलेट करतं आणि त्यानुसार ब्राइटनेस आपोआप कमी-जास्त करतो.

First published:

Tags: Smartphone, Tech news