AntiVirus पासूनच तुमच्या स्मार्टफोनला धोका, या 10 Apps पैकी तुम्ही कोणतं वापरताय?

AntiVirus पासूनच तुमच्या स्मार्टफोनला धोका, या 10 Apps पैकी तुम्ही कोणतं वापरताय?

स्मार्टफोनला व्हायरस लागू नये म्हणून तुम्हीही Cleaner सारखी अॅप वापरत असाल तर एकदा ही 10 धोकादायक अॅपची यादी तपासून पाहा.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : स्मार्टफोनने आपली कामं जितकी सहज आणि सोपी केली आहेत. तितकीच खासगी सुरक्षा धोक्यात आली आहे. मोबाइलमध्ये डेटा सुरक्षित रहावा आणि व्हायरस लागू नये यासाठी अनेक अँटीव्हायरस अॅप वापरली जातात. यामध्ये अनेक युजर्स स्मार्टफोनच्या मालवेअर व्हायरसपासून वाचण्यासाठी सर्वाधिक डाउनलोड अॅप इन्स्टॉल करत असतात. आता एक असं अँटीव्हायरस अॅप शोधण्यात आलं आहे जे युजर्ससाठी धोकादायक आहे. प्रायव्हसी आणि सिक्युरिटी रिसर्च फर्म VPNPro ने याचा शोध लावला आहे. ही गोष्ट गंभीर आहे कारण जगातील जवळपास 190 कोटी लोकांच्या स्मार्टफोनमध्ये हे अॅप आहे.

सिक्युरिटी फर्मने सांगितलं की, गूगल प्ले स्टोअरवर अशी 10 अँटी व्हायरस अॅप आहेत जी स्मार्टफोन युजर्सना फसवतात. या अॅपद्वारे फोनमधील डेटा आणि इतर माहिती चोरली जाते. इतकंच नाही तर फोनवरील सर्व अपडेट त्रयस्थ व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

कंपनीमार्फत शोधलेली ही धोकादायक अॅप युजरच्या परवानगीने गोळा केलेला डेटा विकतात. याशिवाय मालवेअर पसरवण्याचंही काम करतात. यातील काही अॅप असे आहेत जे स्मार्टफोनमधून अनइन्स्टॉल होण्यासाठीही पैसे आकारतात.

App List :

Security master, Antivirus Free 2019, 360 Security, Virus Cleaner 2019, Super Phone Cleaner, 360 Security Lite, Super Cleaner, Clean Master, Super Security, Antivirus Mobile,

याआधीही अशा प्रकारची अॅप सापडली होती. त्याच अॅप्सचा पुन्हा नव्या यादीतही समावेश आहे. गेल्यावेळी 5 आणि आता 5 अशी मिळून 10 अॅप्स युजरच्या स्मार्टफोनला लक्ष्य करत होती. यापैकी 5 अॅप गुगलने प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. सिक्युरिटी फर्मने सांगितलं की, ही अॅप्स 50 कोटी वेळा डाउनलोड करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 07:27 AM IST

ताज्या बातम्या