मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कोरोना काळातही 'या' एअरलाइन्सची 30 मिनिटांत विकली गेली 900 तिकिटं, प्रवाशांना देतेय खास सेवा

कोरोना काळातही 'या' एअरलाइन्सची 30 मिनिटांत विकली गेली 900 तिकिटं, प्रवाशांना देतेय खास सेवा

वाचा ही एअरलाइन्स अशी काय सेवा देत आहे की कोरोनाकाळात 30 मिनिटांत लोकांनी विकत घेतलं तिकिट.

वाचा ही एअरलाइन्स अशी काय सेवा देत आहे की कोरोनाकाळात 30 मिनिटांत लोकांनी विकत घेतलं तिकिट.

वाचा ही एअरलाइन्स अशी काय सेवा देत आहे की कोरोनाकाळात 30 मिनिटांत लोकांनी विकत घेतलं तिकिट.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : कोरोनाच्या संकटकाळात हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प पडले असून विविध मार्गांनी पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंगापूरमध्येदेखील अशाच पद्धतीने एका विमान कंपनीने आपल्या ग्राहकांना विमानात जेवण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सिंगापूर एअरलाईन्सने आपल्या A380 या जेटमध्ये जेवण करण्याची नागरिकांना संधी उपलब्ध करून दिली आहे. 642 सिंगापुरी डॉलर्समध्ये म्हणजे साधारण 34 हजार 668 रुपयांमध्ये नागरिक विमानामध्ये जेवणाचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर भाडेतत्त्वावर विमान देण्याची नवीन योजना देखील आणली आहे. कोरोनाच्या या काळात कंपनीने हजारो कामगारांची कपात केली आहे. त्याचबरोबर जवळपास सर्वच विमानांनी उड्डाण केलं नसून या विमानांना पॉपअप रेस्टोरंटमध्ये बदलण्यात आले आहे. वाचा-सणासुदीच्या काळात महिंद्राकडून 'या' वाहनांवर 3 लाखांपर्यंत सूट स्ट्रेट्स टाइम्स या वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार, विमान कंपन्यांनी या ऑफरची घोषणा केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तिकिटं संपली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये 900 तिकिटं विकली गेली असून 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी या विमान रेस्टोरंटमध्ये जेवणाचा आनंद घेता येणार आहे. वाचा-जगात भारी कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल या विमानांमधील रेस्टोरंटमध्ये विविध प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. या विमानातील जेवणाला मिळणारा प्रतिसाद पाहून हे रेस्टोरंट आणखी दोन दिवस उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विमानातील रेस्टोरंटमधील first-class suite मधील चार कोर्स असलेलं जेवण सर्वांत महाग असणार आहे. त्यानंतर 53 सिंगापुरी डॉलर्समध्ये साधारण 2 हजार 862 रुपयांत सर्वांत स्वस्त जेवण मिळणार असून यामध्ये तीन कोर्सचं जेवण मिळणार आहे. वाचा-मोबाईल अ‍ॅप वापरण्यातही भारतीय आघाडीवर, Tiktok आणि Tinderला सर्वाधिक प्राधान्य चांगी एअरपोर्टवर उभ्या असलेल्या या विमानात सुरक्षेसंबंधी सर्व काळजी घेण्यात येत आहे. डबलडेकर विमानातील अर्ध्या सीट्स रिकाम्या ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या रेस्टोरंटमधील अन्न होम डिलिव्हरीदेखील करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणाला घरी बसून हे जेवण करण्याची इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होणार आहे.
First published:

पुढील बातम्या