Home /News /technology /

दोन वर्षांपूर्वी हरवली होती तरुणी, Google Maps वर अशी सापडली

दोन वर्षांपूर्वी हरवली होती तरुणी, Google Maps वर अशी सापडली

दोन वर्षांपूर्वी हरवलेली तरुणी Google Maps वर दिसली असल्याची घटना समोर आली आहे. 19 वर्षी लिआ क्राउचर 15 फेब्रुवारी 2019 रोजी कामाला जाताना हरवली होती.

  लंडन, 12 ऑक्टोबर : दोन वर्षांपूर्वी हरवलेली तरुणी Google Maps वर दिसली असल्याची घटना समोर आली आहे. 19 वर्षी लिआ क्राउचर 15 फेब्रुवारी 2019 रोजी कामाला जाताना हरवली होती. एका युजरने Google Maps त्या हरवलेल्या तरुणीला पाहिलं. त्यानंतर Google Maps वरील तरुणीता तो फोटो पोलिसांकडे चौकशीसाठी देण्यात आला. ही घटना इंग्लंडमधील आहे. मार्च 2019 मध्ये Google Maps एका युजरला त्या हरवलेल्या तरुणीचा शोध लागला. हा फोटो पोलिसांत दिल्यानंतर त्यांनी ते ज्या फोटोचा तपास करत होते, तो हाच फोटो असल्याचं म्हटलं. हा फोटो ईटन ब्रेमध्ये एका मोठ्या घराच्या मैदानात घेण्यात आला होता. लिआ जिथे राहत होती, तिथपासून 18 किलोमीटरवर बकिंघमशायरमध्ये मिल्टन कीन्स येथे हा फोटो आढळला. 2019 मध्ये म्हणजेच जवळपास दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी घर आणि मैदानाचा तपास घेतला होता. एका युजरने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पोलिसांना मैदानात खोदकाम करताना पाहिलं. त्यानंतर या खोदकामाबद्दल विचारणा केली असता, लोकांनी हा लिआ क्राउचरच्या तपासाचा भाग असल्याची माहिती दिली. 2019 मध्ये पोलिसांच्या कारवाईबाबत ऐकल्यानंतर लिआ क्राउचर डिसअपीअरेन्स या फेसबुक पेजच्या एका सदस्याने Google Maps वर फोटो शोधण्यास सुरुवात केली.

  पत्ता शोधण्यासाठी Google Maps ओपन केलं, कपलचं अश्लील कृत्य पाहून हादरली महिला

  त्या युजरने सांगितलं, की Google Maps वर मी झूम करुन पाहण्यास सुरुवात केली आणि अचानक माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही, की एका ठिकाणी एका महिलेची आकृती लिआसारखी दिसली. त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

  Google Maps ने दाखवला नरकात जाणारा रस्ता, आणि व्यक्तीने शोधून काढलं 'नरकाचं दार'!

  पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलीस या Google Maps वरील फोटोचा तपास घेत असून लिआ क्राउचर हरवलेल्या टीमसोबत या फोटोची समिक्षा करत आहेत. युजरने लिआ क्राउचरसारखीच दिसणारी तरुणी Google Maps वर पाहिली आणि लगेच याबाबत पोलिसांत माहिती दिली. आता पोलीस या फोटोनुसार, Google Maps वर आढळलेल्या लोकेशनच्या दिशेने तरुणीचा तपास घेत आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या