Home /News /technology /

सावधान! या चुका केल्यात तर SIM मुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

सावधान! या चुका केल्यात तर SIM मुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं

अशा घोटाळ्यांपासून कसं राहाल सावध? जाणून घ्या काय कराल

    मुंबई, 23 नोव्हेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान वाढणारं सायबर क्राइम आणि फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बँक खात्यातून पैसे काढून घेण्यासाठी हँकर्सही वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. अशा परिस्थितीत आपलं इंटरनेट आणि मोबाईल खूप सावधगिरीनं आणि सजगपणे बाऴगणं गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे सिम स्वॅपचा वापर करून आपलं खातं रिकामं होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हॅकर्सनी आता कॉलिंग, लिंक सेंड करणं यापेक्षा वेगळं म्हणजे सिम स्वॅपद्वारे फसवणूक करण्याचा प्रकार सुरू केला आहे. मोबाइल फोन हा बँकिंगचा एक महत्वाचा भाग आहे. आजकाल बहुतेक लोक मोबाईलद्वारे बँकिंगचे काम करतात. प्रत्येकास मोबाईलवर त्यांच्या खात्याची सगळी माहिती मिळते. याशिवाय OTP पाठवून त्याद्वारे देखील बँकेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशावेळी सिम स्वॅपद्वारे फसवणूक करणारे हॅकर्स या संधीचा फायदा उचलतात. सर्व्हिस प्रोव्हाडरकडे जेव्हा एखादं नवीन SIM घेण्यासाठी जाता तेव्हा देखील तो तुमचे बँकेची माहिती आणि ओटीपी मागून घेऊ शकतो. त्याद्वारे सिम स्वॅपकरून आपलं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता देखील असते. हे वाचा-रुग्ण पाहात होता बिग बॉस शो आणि डॉक्टरनं केली ओपन ब्रेन सर्जरी काय गोष्टी लक्षात ठेवाल? आपला OTP नंबर कुणालाही देऊ नका. फिशिंग मालवेयर सॉफ्टवेअरच्या मदतीनं बँकेच्या खात्याची माहिती मिळवली जाते. बनावट कॉल आणि खोटी माहिती सांगून आपल्याकडून बँक खात्याचे डिटेल्स काढले जाऊ शकतात. मोबाईल फोन, नवीन फोन किंवा तुटलेली सिम कार्ड हरवण्याची खोटी सबब सांगून देखील अकाऊंचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात. कस्टम व्हेरिफिकेशन दरम्यान जुनं सिमकार्ड डिअॅक्टीवेट करून ग्राहकांना नवीन सिम दिलं जातं. या नव्या सिमकार्डला रेंज येत नाही. त्यामुळे त्यावर कोणतेही अलर्ट येत नाही ना SMS. अशा घोटाळ्यांपासून कसं राहाल सावध? तुम्हाला कोणताही कॉल किंवा एसएमएस नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही त्याबाबत त्वरित मोबाईल ऑपरेटरशी बोलावे जेणेकरुन तुम्हाला कळेल की तुमच्यासोबत काही फसवणूक झाली आहे. या व्यतिरिक्त काही मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आणि ग्राहक सिम स्वॅपविषयी सतर्कतेसाठी ग्राहकांना अलर्ट पाठविते, याचा अर्थ असा की आपण कारवाई करू शकता आणि आपल्या मोबाइल ऑपरेटरशी त्वरित संपर्क साधून ही फसवणूक थांबवू शकता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Cyber crime

    पुढील बातम्या