Elec-widget

‘न्यूड फोटो’वाल्या SMSला बळी पडू नका, असे अडकू शकता जाळ्यात

‘न्यूड फोटो’वाल्या SMSला बळी पडू नका, असे अडकू शकता जाळ्यात

युझर्स जशी ही लिंक क्लिक करतात, अटॅकर त्यांचे जवळपास सर्व प्रकारच्या फाइल टाइप (फोटो आणि टेक्स्ट) त्यांच्या परवानगीशिवाय इनक्रिप्ट करतात.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट- दिवसेंदिवस सायबर क्राइमचे किस्से वाढताना दिसत आहेत. त्यातही अँड्रॉइड स्मार्टफोनशी निगडीत अनेक प्रकरण दररोज वाचायला मिळतात. इतर स्मार्टफोनपेक्षा अँड्रॉइडचे फोनना सायबर सुरक्षेचा जोरदार फटका बसतो. स्लोवाकिया येथील सायबर सिक्युरिटी रिसर्च कंपनीने नव्या रँसमवेअरचा शोध लावला आहे. हे सेक्स सिमुलेटर अ‍ॅपच्या मदतीने स्पॅम टेक्स्ट मेसेजही पाठवले जातात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर युझरना सेक्सुअल कंटेट असलेले टेक्स्ट मेसेज पाठवले जातात. या मेसेजचा उपयोग भविष्यात ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो.

सायबर सिक्युरिटी रिसर्च कंपनीनुसार रँसमवेअर 12 जुलैला सक्रिय झालं आणि त्याने युझर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर हल्ला केला. युझर्सचं लक्ष स्वतःकडे केंद्रित करण्यासाठी या अपमध्ये अनेक सेक्स सिम्युलेटर गेम आहेत. 12 जुलैनंतर Android/ Filecoder.C नावाच्या रँसमवेअरने युझरला अश्लील कंटेटसह मॅलिशस लिंक एसएमएसद्वारे पाठवायला सुरुवात केली. हा मेसेज हिंदी आणि इंग्रजीसह एकूण 42 भाषांमध्ये असू शकतो. अशा पद्धतीने युझर न कळत निशाण्यावर येतो.

अशा पद्धतीचे मेसेज पाठवले जातात-

या मेसेजमध्ये ‘(तुमचं नाव), हे पाहा तुमचे काही फोटो’ असा संदेश लिहिलेला असतो. यासोबत एक लिंकही दिलेली असते. काही युझर्सना त्यांचे काही न्यूड फोटो लिक झाले असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर ते दिसतात असाही मेसेज जातो. युझरना या मेसेजसोबत आणखी अपच्या लिंकही पाठवल्या जातात, जे सतत सांगत असतात की त्यांचा फोटो दुसरीकडे वापरण्यात आला आहे. डाउनलोड होणारे हे अप एक मॅलिशस अप असतात, ज्यामुळे डिवाइसचं मोठं नुकसान होतं.

डेटाच्या मोबदल्यात ब्लॅकमेल करणं

Loading...

युझर्स जशी ही लिंक क्लिक करतात, अटॅकर त्यांचे जवळपास सर्व प्रकारच्या फाइल टाइप (फोटो आणि टेक्स्ट) त्यांच्या परवानगीशिवाय इनक्रिप्ट करतात. जर हे इनक्रिप्शन झालं तर युझर त्याचे मोबाइलमधला एकही फोटो किंवा फाइल उघडू शकत नाही. यानंतर अटॅकर धमकी देऊन पैशांची मागणी करू शकतो. तसेच पैसे न दिल्यास डेटा डिलीट करण्याची धमकीही देऊ शकतो. आतापर्यंत किती डिवाइसवर या रँसमवेअरचा परिणाम झाला आहे हे कळू शकलेलं नाही. संशोधकांच्या मते, सर्वात जास्त क्लिक चीन, यूएस आणि हाँग काँगमध्ये केले गेले आहेत.

भगवान बुद्धाचे हे विचार बदलू शकतात तुमचं आयुष्य!

सावधान! या राशीचे प्रेमसंबंध आज तुटू शकतात

'या' सोप्या उपायांनी काही क्षणात दूर होतील डोळ्याखालची वर्तुळं!

VIDEO: पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, कोल्हापुरातल्या गावांना धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 07:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...