मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter, Apple iCloud मध्ये आढळला असुरक्षित बग, हॅकिंगचा धोका

Twitter, Apple iCloud मध्ये आढळला असुरक्षित बग, हॅकिंगचा धोका

अनेक कंपन्यांच्या आयटी सुरक्षा टीमला Log4Shell नावाच्या असुरक्षित बगला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे हॅकिंगचा मोठा धोका निर्माण झाल्याचं जाणकारांकडून सांगण्यात आलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : Apple iCloud, Amazon, Twitter, Cloudflare आणि Minecraft यासह अनेक लोकप्रिय सेवा Zero day Exploit मुळे असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. सायबर सुरक्षा रिसर्चरने याबाबत इशारा दिला आहे. अनेक कंपन्यांच्या आयटी सुरक्षा टीमला Log4Shell नावाच्या असुरक्षित बगला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे हॅकिंगचा मोठा धोका निर्माण झाल्याचं जाणकारांकडून सांगण्यात आलं आहे.

Zero day Exploit हा सॉफ्टवेअरच्या असुरक्षिततेला लक्ष्य करणारा एक प्रकारचा सायबर अटॅक आहे, जो सॉफ्टवेअर आणि अँटीव्हायरस कंपन्यांना माहित नसतो. हा Zero day Exploit Log4Shell नावाच्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Java लॉगिंग सिस्टममध्ये आढळतो.

लपून-छपून कोण पाहतंय तुमचं Facebook Profile? असं तपासा

अनेक सेवा या Zero day Exploit मुळे असुरक्षित आहेत. क्लाउड सर्विसेस Steam, Apple iCloud आणि Minecraft सारखे Apps याआधीही असुरक्षित असल्याचं आढळलं होतं, असं LunaSec कंपनीच्या रिसर्चर्सकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsApp ची मोठी घोषणा; आता युजरला क्रिप्टोकरन्सीमध्येही करता येणार व्यवहार

TechCrunch च्या रिपोर्टनुसार, Log4Shell बगने सायबर अटॅक झाल्याची पुष्टी केलेल्या अनेक असुरक्षित सर्व्हर असलेल्या कंपन्यांमध्ये Apple, Amazon, Cloudflare, Twitter, Steam, Baidu, NetEase, Tencent आणि Elastic यांचा समावेश आहे. या Log4Shell बग सायबर हल्ल्यात हजारो कंपन्या प्रभावित झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

First published:

Tags: Cyber crime, Tech news, Twitter