• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • सेल्फी काढल्याने नुकसान होत आहे पर्यावरणावर, जाणून घ्या काय आहेत परिणाम

सेल्फी काढल्याने नुकसान होत आहे पर्यावरणावर, जाणून घ्या काय आहेत परिणाम

तुम्ही काढत असलेल्या सेल्फीचा पर्यावरणावर परिणाम होतो. खरं तर, सेल्फी काढल्यामुळे कार्बनं प्रमाण वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वातारणावर होतो.

 • Share this:
  मुंबई, 8 जुलै : सेल्फी काढणं अनेकांचा छंदच झाला आहे असं एकंदरीत आजच्या परिस्थितीवरुन वाटत. सेल्फी काढण्यात जेवढी मजा आहे तेवढेच त्याचे चांगले-वाईट परिणामही आहेत. त्याचा प्रत्यय वारंवार होणाऱ्या घटनांमुळे होत असतो. वैयक्तिक जीवनात अनेकांनी सेल्फीमुळे आपला जीव गमावला आहे. तर काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या अभ्यासामध्ये असं सांगण्यात आलं की, सेल्फीशी निगडीत आजाराला ऑब्सेसिव कंप्लसिव डिसऑर्डर असं म्हटलं जातं. पण, त्याशिवाय तुम्ही काढत असलेल्या सेल्फीचा पर्यावरणावर परिणाम होतो. खरं तर, सेल्फी काढल्यामुळे कार्बनं प्रमाण वाढत आहे. त्याचा थेट परिणाम वातारणावर होतो. जगभरातूनच या समस्येचा सामना करावा लागत आहे. सावधान! अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलंय डाऊनलोड स्मार्टफोन आल्यापासून लोकांमध्ये फोटो काढण्याची क्रेझ वाढली आहे. सतत हातात मोबाइल असल्याने कुठेही फोटो काढणं सोचं झालं आहे. एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2000 सालापर्यंत जगभरातून जवळपास 85 अब्ज इतके फोटो काढले गेले. पण, केवळ एका दशकात त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. 2013 मध्ये जगभरातून 3.5 लाख कोटी फोटो काढण्यात आले. तज्ञांकडून असाही अंदाज वर्तवला जात आहे की, येणाऱ्या काळात हे आकडे दुप्पट वाढून 7 लाख कोटींपर्यंत पोहचू शकतात. दोन अब्जांहून जास्त स्मार्टफोनधारक एका रिपोर्टच्या माहितीनुसार, जगभरात 2 अब्जांपेक्षा जास्त स्मार्टफोन युजर आहेत. तर, 2014 च्या रिपोर्टनुसार 4.4 अब्ज लोकांकडे साधा कॅमेरा असणारे फोन आहेत. जवळपास 90 टक्के लोकं फोनमध्येच फोटो काढतात. यावरुनच अंदाज लावता येऊ शकेल की, किती प्रमाणात हे फोटो सोशल मीडियावर अपलोड होत असतील. एवढे फोटो नक्की होतात कुठे स्टोअर सोशल मीडियावर अपलोड केले जाणारे फोटो खूप मोठ्या संख्येत डेटा तयार करतात. फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडिया साइटवर येणारे फोटो स्टोअर करण्यासाठी डेटा सेटरची गरज असते. हे फोटो सोशल मीडियावर अपलोड होतात आणि काही काळाने टाईमलाईनवरुन निघूनही जातात. मात्र, हा सर्व डेटा कुठेतरी सेव होत असतो. अ‍ॅनालिटिक्स मैगज़ीन 2012 च्या माहितीनुसार सर्व सेंटरवर स्टोअर होणारा 80 टक्के डेटा हा फोटो आणि व्हिडीओ माध्यमातला असतो. स्विच ऑफ असलेल्या OnePlus स्मार्टफोनला मध्यरात्री लागली आग डेटा सेंटरमुळे वाढतो वीजेचा अतीवापर सिएनाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 7500 डेटा सेंटर आहेत. 21 टक्क्यांनी वाढ झाल्याने आणि डेटा सेंटर वाढणार आहेत. या सेंटरमध्ये फेसबुक, गूगल, माईक्रोसॉफ्ट या मोठ्या कंपन्यानांचा डेटाही स्टोअर असतो. संपूर्म जगाच्या वीजउत्पदापैकी 3 टक्के इतका वापर डेटा सेंटरला वापरला जातो. 2020 पर्यंत प्रत्येक तासाला 140 अब्ज किलोवॅट इतक्या विजेची आवश्यकता पडेल. म्हणजेच 50 पॉवर प्लांटची गरज आहे. वाढत्या कार्बनचं प्रमाण डेटा सेंटरला सतत म्हणजे 24 तास वीजेची आवश्यकता असते. वाढत्या वापरासोबत गरज आहे ती पॉवर प्लांटची. 50 पॉवर प्लांटसाठी 100 100मी. मैट्रिक टन कार्बन बाहेर पडतो. एकंदरीत तो पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे फोटो आणि व्हिडीओ काढणं सोपं आणि मजेशीर असलं तरी, पर्यावरणासाठी खूप हानिकारक आहे. VIDEO: वारकऱ्यांसाठी नवनीत राणांकडून स्पेशल ट्रेन, पावसासाठी विठुरायाकडे साकडं
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: