Google वर आज 'हे' शब्द सर्च करून बघा, स्क्रीनवर होईल फटाक्यांची आतषबाजी!

Google वर आज 'हे' शब्द सर्च करून बघा, स्क्रीनवर होईल फटाक्यांची आतषबाजी!

आजचं google doodle खास आहे. आजची तारीख गुगल सर्च इंजिनवर टाकून पाहा, तुमच्या स्क्रीनवर फटाके फुटतील.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै : Google वरचे Doodle नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. कोणत्या दिवशी काय झालं याची माहिती देण्यासाठी गुगलने इंटरॅक्टिव्ह पद्धत शोधून Google Doodle प्रसिद्ध केलं. अनेक वेळा दिनविशेष डुडलच्या स्वरुपात मांडलं जातं. आजचं google doodle खास आहे. आजची तारीख गुगल सर्च इंजिनवर टाकून पाहा, तुम्हाला दिनविशेष काय ते समजेल. तुम्ही Google वर आजची तारीख - 4th July असा सर्च केल्यास तुमच्या समोर असलेल्या स्क्रीनवर फटाक्यांची आतषबाजी होईल.  त्याचं कारण असं की, अमेरिकेमध्ये आजच्या दिवशी म्हणजे 4 जुलैला स्वातंत्र दिन साजरा केला जातो. याचं सेलिब्रेशन गुगलही करताना दिसत आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हे खास डुडल सादर करण्यात आलं आहे.

तुम्हालाही ही आतषबाजी बघायची असेल तुमच्या गुगलवर 4th july  किंवा  fourth of july असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला रंगीत फटाके दिसतील.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

ही अशी आतषबाजी पहिल्यांदा फेसबुकवर तुम्ही अनेकदा पाहिली असेल. हा अनुभव Google वर मात्र नवा आहे.

4 जुलै 1776 या दिवशी अमेरिकेला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आलं. ब्रिटीशांची अमेरिकन वसाहत असलेली राज्यं स्वतंत्र झाली. ब्रिटीश राजेशाहीतून मुक्त होत ही संयुक्त राष्ट्र सार्वभौम म्हणून घोषित करण्यात आली. या स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन म्हणून अमेरिकेत 4 जुलैला सार्वत्रिक सुट्टी असते. इंडिपेंडन्स हॉलिडेच्या दिवशी Google ने सुद्धा आपल्या देशासाठी खास असं सेलिब्रेशन केलं आहे.

सिंधुदुर्गात नितेश राणेंचा राडा; अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचा VIDEO समोर

First published: July 4, 2019, 3:17 PM IST

ताज्या बातम्या