नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्क्रॅपेज पॉलिसी (Scrappage Policy) लाँच केली. यानंतर आता जुन्या आणि नव्या वाहनांबाबत मोठे बदल होणार आहेत. या स्क्रॅपेज पॉलिसीमुळे अनेक जुन्या गाड्या भंगारात जातील, तर नव्या गाड्या खरेदी करताना मोठे फायदेही मिळतील. जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल, आणि नवी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. नवी गाडी खरेदी करताना चांगले फायदे होतील.
नव्या पॉलिसीनुसार, स्क्रॅप होणाऱ्या वाहनाच्या बदल्यात त्याच्या एक्स शोरुम किंमतीच्या 4 ते 6 टक्के रक्कम परत मिळेल. तसंच गाडी स्क्रॅपमध्ये दिल्यानंतर त्याचं एक सर्टिफिकेट मिळेल. त्याशिवाय नव्या वाहनाच्या किंमतीवर 15 टक्के फायदा मिळेल.
कसा मिळेल 15 टक्के फायदा?
स्क्रॅप सर्टिफिकेट आणि नव्या वाहनाच्या रजिस्ट्रेशनवरील सूट मिळून 10 टक्क्यांपर्यंत फायदा होऊ शकतो. त्याशिवाय नव्या वाहनावर 5 टक्के वेगळा डिस्काउंट दिला जाईल. अशाप्रकारे एकूण 15 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच जुनी गाडी स्क्रॅपमध्ये दिल्यानंतर 10 लाख रुपयांची नवी गाडी खरेदी करताना, एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.
जर एखादी गाडी 10 ते 15 वर्ष जुनी असेल, पण त्या गाडीची स्थिती चांगली असेल आणि ती तुम्हाला स्क्रॅपमध्ये द्यायची नसल्यास, त्या गाडीसाठी एक फिटनेट सर्टिफिकेट द्यावं लागेल. हे सर्टिफिकेट दर पाच वर्षांनी रिन्यू करावं लागेल. हे फिटनेट सर्टिफिकेट प्रदूषण टेस्ट, रस्त्यावर चालवण्यासाठी गाडीची क्षमता, पर्यावरण याआधारावर असेल. यात गाडीचे काही पार्ट्स तपासले जातील.
देशात खासगी वाहनांचं रजिस्ट्रेशन 15 वर्ष आणि कमर्शियल वाहनांसाठी 10 वर्षांसाठी असतं. त्यानंतर वाहन स्क्रॅप केलं जाऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.