Home /News /technology /

आता अंधारातही काढता येणार Color Photo, फ्लॅशचीही गरज नाही!

आता अंधारातही काढता येणार Color Photo, फ्लॅशचीही गरज नाही!

बऱ्याचदा पर्यटनाला (Tourism) गेल्यावर कमी प्रकाशामुळे चांगले फोटोज (Photos) घेता न आल्यानं अनेक जण नाराजी व्यक्त करतात. अनेकदा अंधारामुळे (Darkness) फोटोज खराब येतात. परंतु, आता या समस्येवर उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 12 एप्रिल : बऱ्याचदा पर्यटनाला (Tourism) गेल्यावर कमी प्रकाशामुळे चांगले फोटोज (Photos) घेता न आल्यानं अनेक जण नाराजी व्यक्त करतात. अनेकदा अंधारामुळे (Darkness) फोटोज खराब येतात. परंतु, आता या समस्येवर उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. शास्त्रज्ञांनी आता अशा कॅमेराची (Camera) निर्मिती केली आहे, की ज्यामुळे अंधारातही कलर फोटो क्लिक करता येणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फ्लॅश किंवा बाह्य प्रकाशाची वाट पाहावी लागणार नाही. इर्विन इथल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या (California University) शास्त्रज्ञांनी हा चमत्कार केला आहे. या शास्त्रज्ञांनी इन्फ्रारेड किरणांच्या (Infrared Rays) मदतीनं असा कॅमेरा तयार केला आहे, जो अंधारातही चांगले फोटोज टिपू शकतो. यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर केला आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, प्रकाशात जसे रंगीत फोटो घेता येतात, तसेच रंगीत फोटो तुम्हाला या कॅमेराच्या मदतीनं अंधारातही घेता येणार आहेत. गेल्या काही वर्षांत कॅमेराच्या तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. काही वर्षांपूर्वी फोटो काढण्यासाठी फिल्म कॅमेराचा वापर होत असे. फोटो काढण्यासाठी विशिष्ट मर्यादा असे. ही मर्यादा संपली की फिल्म डेव्हलप करून फोटोजची प्रिंट काढली जात असे. त्यानंतर प्रगत तंत्रज्ञानामुळे फिल्मची जागा मेमरी कार्डने घेतली. कॅमेराच्या तंत्रज्ञानातही मोठा बदल झाला. फिल्म कॅमेराची जागा डिजिटल कॅमेराने घेतली. दरम्यानच्या काळात स्मार्टफोन आले आणि डिजिटल कॅमेराच्या तुलनेत मोबाइल कॅमेराचा वापर सर्वाधिक प्रमाणात होऊ लागला. या सर्व पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी इन्फ्रारेड किरणांच्या मदतीनं कॅमेराची निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे कॅमेरा तंत्रज्ञानातलं हे पुढचं पाऊल म्हणावं लागेल. इन्फ्रारेड किरणांच्या मदतीनं बनवला कॅमेरा प्लॉस वन नावाच्या जर्नलमध्ये या कॅमेराच्या अनुषंगानं एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा कॅमेरा नाइट व्हिजन सिस्टीम इन्फ्रारेड लाइट्सचा वापर करून तयार करण्यात आला आहे. मानव ते पाहू शकत नाही; पण फोटो काढल्यानंतर ते रेंडर केले जातात म्हणजेच डिजिटल डिस्प्लेसाठी (Digital Display) योग्य बनवले जातात. हे फोटो मोनोक्रोमिक असतात, असं या अहवालात म्हटलं आहे. माणूस केवळ 300 ते 700 नॅनोमीटरपर्यंत पाहू शकतो शास्त्रज्ञांनी ज्या कृत्रिम अल्गोरिदमचा (Artificial Algorithms) वापर करून फोटोज टिपण्याची सुविधा निर्माण केली आहे, तो एक प्रकारचा डीप लर्निंग अल्गोरिदम आहे. हा अल्गोरिदम मानवी मेंदू आणि त्याच्या हालचाली टिपतो आणि त्यावरून शिकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा अल्गोरिदम न्यूरल नेटवर्कप्रमाणे काम करतो. मानवी डोळे केवळ दृश्यमान स्पेक्ट्रममध्ये पाहू शकतात. याचाच अर्थ माणूस केवळ 300 ते 700 नॅनोमीटरपर्यंतच प्रकाश पाहू शकतो. इन्फ्रारेड किरणांची रेंज 700 नॅनोमीटरच्या वर असल्याने माणूस ही किरणं पाहू शकत नाही.
First published:

पुढील बातम्या