मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! तुमच्या Whatsapp ची माहिती होऊ शकते लीक, App वापरताना 'हे' टाळा

सावधान! तुमच्या Whatsapp ची माहिती होऊ शकते लीक, App वापरताना 'हे' टाळा

यावरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हे मुद्दामहुन केलं असल्याची चर्चा आहे. परंतु गुगलनं अल्गोरिदम केलं आणि  Click to chat च्या मेटाडेटावरून सर्व फोननंबर काढून टाकले. हे नंबर नंतर गुगल सर्च इंडेक्समध्ये सेव्ह केरण्यात आले आहेत.

यावरून सध्या सोशल मीडियावर मोठा वाद सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपने हे मुद्दामहुन केलं असल्याची चर्चा आहे. परंतु गुगलनं अल्गोरिदम केलं आणि Click to chat च्या मेटाडेटावरून सर्व फोननंबर काढून टाकले. हे नंबर नंतर गुगल सर्च इंडेक्समध्ये सेव्ह केरण्यात आले आहेत.

व्हॉटसअ‍ॅपवर गेल्या काही दिवसांपासून अनेक घोटाळे समोर आले आहेत. मेसेजिंग अ‍ॅपमध्ये व्हॉटसअ‍ॅपवरची माहिती अधिक धोक्यात असल्याच समोर आलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 02 मार्च : सोशल मीडियाचा वापर करताना आपली वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती अधिक असते. आपले अनेक व्यवहार हे अ‍ॅपच्या साहाय्याने सुरू असतात. त्यामुळे या अ‍ॅपचा वापर सुरक्षित आहेत ना याची खात्री करणं आवश्यक आहे. जगभरात Whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरची वैयक्तिक माहिती लीक होतं असल्याचं समोर आलं आहे. Whatsapp वर एका स्कॅमच्या मदतीनं यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. एका रिसर्च दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यापासून यूजर्सच्या पर्सनल माहितीची चोरी केली जात आहे. यूजर्सचं नाव, पत्ता, फोन नंबर चोरीला जातो आहे. एका रिपोर्टनुसार गेल्या 3 महिन्यात व्हॉटसअ‍ॅपवरची माहिती जास्त लीक झाली आहे. 2019 मध्ये जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये 13 टक्के माहिती ही व्हॉटसअ‍ॅपवरून लीक झाली. तर वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यामध्ये 25 टक्के माहिती लीक झाली आहे.सिक्यॉरिटी फर्मनं दिलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. व्हॉटसअ‍ॅपवर माहिती लीक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तुमचा डेटा लीक झाला नाही ना याची खात्री करू घ्या. इतर बातम्या: पॉर्न साइटवरच्या न्यूड सेल्फी आणि VIDEO क्लिप लीक, तब्बल 800 चित्रपटांएवढा डेटा कोणत्याही लिंकवर क्लिक करून त्यावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करण्याआधी त्याची माहिती करून घ्या. अडल्ट ग्रुपचं इनव्हिटेशन तपासून पाहा व्हॉटसअ‍ॅपवर पॉर्नशी संबंधित चॅट यूजर्सना पर्सनल माहितीसाठी शेयर केलं जातं. या लिंकचे अनेकजण शिकार बनले आहेत. अडल्ट कंटेंट शेअर करून व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर यूजर्सना इनव्हाईट केली जाते. यानंतर त्या ग्रुपमध्ये जॉईन झालेल्यानंतर तुमची माहिती चोरीला जाते. तुमचे अकांऊटवरचे फोटो, व्हिडिओसह सर्व माहिती लीक होऊ शकते. तुमच्या व्हॉटसअ‍ॅपवर लिंक दिली जाते. त्यातून BerBagi अडल्ड जे व्हॉटसअ‍ॅप ग्रुपसोबत जोडले जातात त्यांना निशाणा बनवलं जात आहे. या लींकचा व्हॉटसअ‍ॅपशी संबंध नाही शिवाय व्हॉटसअ‍ॅपमध्ये असणाऱ्या कोणत्याही कमतरतेमुळे हा स्कॅम होतं नसून यूजर्सनी लिंकवर क्लिक केल्यास हा स्कॅम होत असल्याचं समोर आल आहे. इतर बातम्या:Honda City लव्हर्सना लवकरच मिळणार सरप्राइज, मार्चमध्ये लॉंच होणार ‘या’ कार
First published:

Tags: Big scam, Massage, Social media, Social media app, Whatsapp

पुढील बातम्या