Home /News /technology /

SBI युजर्स सावधान, Yono SMS लिंकद्वारे होतोय स्कॅम; एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाउंट

SBI युजर्स सावधान, Yono SMS लिंकद्वारे होतोय स्कॅम; एक चूक आणि रिकामं होईल बँक अकाउंट

फेक SMS द्वारे SBI बँक अकाउंट युजर्सला टार्गेट केलं जात आहे. स्कॅमर्स अशा ग्राहकांना टार्गेट करत आहेत, जे SBI Yono App चा वापर करतात.

  नवी दिल्ली, 12 एप्रिल : इंटरनेटच्या जगात आता दरदिवशी सायबर हल्ले, ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) घटना समोर येत असतात. सर्वसामान्यांच्या पैशांवर हॅकर्सची नजर असून अनेकांच्या अकाउंटमधून पैसे चोरी झाले आहेत. हॅकर्स बँक ग्राहकांची पर्सनल माहिती घेऊन त्यांना फेक लिंक पाठवून टार्गेट केलं जातं. आता पुन्हा एकदा हॅकर्स ग्राहकांना निशाणा करत आहेत. फेक SMS द्वारे SBI बँक अकाउंट युजर्सला टार्गेट केलं जात आहे. स्कॅमर्स अशा ग्राहकांना टार्गेट करत आहेत, जे SBI Yono App चा वापर करतात. SBI Yono हे बँकिंग App आहे. ज्याद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक बँक सर्विसचा वापर करतात. या स्कॅममध्ये स्कॅमर्स टार्गेटेड ग्राहकांना एक SMS पाठवतात. या एसएमएसमध्ये SBI Yono बाबत एक फेक लिंक (SBI Yono Fraud SMS Link) असते. मेसेजमधून युजर्सला त्यांचं SBI Yono ब्लॉक होईल असं सांगितलं जातं. ते ब्लॉक होऊ नये म्हणून लिंकवर क्लिक करुन PAN कार्ड अपडेट करण्यासाठी सांगितलं जातं. ग्राहकही घाबरुन Yono ब्लॉक होईल म्हणून दिलेल्या लिंकवर क्लिक करतात. मेसेजमध्ये पाठवलेली लिंक अगदी खरी असल्याचं वाटतं. त्यामुळे ग्राहकही हा एसएमएस, लिंक बँकेनेच पाठवल्याचं समजतात आणि क्लिक करु माहिती अपडेट करतात. परंतु इथेच स्कॅम होतो आणि ग्राहकांच्या अकाउंटमधून पैसे चोरी होतात.

  हे वाचा - व्यक्तीच्या मृत्यूनंतर PAN आणि आधारकार्डचा गैरवापर होऊ नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर

  या फेक SMS मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फेक वेबसाइटवर रिडायरेक्ट केलं जातं. इथे पर्सनल डिटेल्स, बँकिंग डिटेल्स मागितले जातात. डिटेल्स भरल्यानंतर ग्राहकांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आणि त्याचा चुकीचा वापर केला जातो. याला फिशिंग अटॅक (Phishing Attack) असंही म्हणतात. SBI ने याबाबत आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. कधीही कोणत्याही SMS, मेलमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. चुकून क्लिक केल्यास कोणतीही माहिती भरू नका. अशा फेक साइट अगदी खऱ्या साइटप्रमाणे दिसतात त्यामुळे ग्राहक फसतात आणि फ्रॉड केला जातो. कोणतीही माहिती हवी असल्यास, KYC किंवा इतर डिटेल्स तपासायचे असल्यास थेट बँकेत जाऊन संपर्क करा आणि माहिती अपडेट करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Online fraud, Sbi alert, SBI bank, Tech news

  पुढील बातम्या