सावधान! Samsung Android फोन अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलं डाऊनलोड

सावधान! Samsung Android फोन अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलं डाऊनलोड

प्ले स्टोअरवर Update for Samsung – Android Update Versions असं एक अ‍ॅप आहे. सॅमसंगच्या फोनचं अपडेट करण्याचा दावा करत आहे. अशा अॅप्सपासून सावधान! होऊ शकतो हा धोका

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : मोबाइलवर अनेकदा आपल्याला अपडेटचं नोटिफिकेशन येतं. हे अपडेट फोनचं, फोनमधल्या अ‍ॅपचं असू शकतं. अगदी सहजपणे आपण हे अपडेट करतो. जगभरात वापरल्या जाणाऱ्या सॅमसंग या कंपनीच्या फोनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्ले स्टोअरवर ‘Update for Samsung – Android Update Versions’ असं एक अ‍ॅप आहे, जे सैमसंगच्या फोनचं अपडेट करण्याचा दावा करत आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी लोकांनी या अ‍ॅपला फोनमध्ये इनस्टॉल केलं आहे. मुळात हे अ‍ॅप पूर्णपणे फेक आहे. हा अ‍ॅप डाऊनलोड केल्याने सॅमसंगचं लेटेस्ट अपडेट मिळेल असं सांगितलं जात आहे. एवढचं नाही तरअ‍ॅप डाऊनलोड केल्यावर एक पेज समोर येतं त्यामध्ये तुम्हाला अपडेट घेण्यासाठी पैसे भरावे लागतील अशी सूचना येते. म्हणजेच हे अ‍ॅप  लोकांना फसवुन पैसे उकळण्याचे धंदे करत आहे. खरं तर असे फेक अ‍ॅप तुमच्या फोनवर हल्ला करून त्यामधील सर्व माहिती चोरी करु शकतात आणि फोन हॅकदेखील करु शकतात.

SPECIAL REPORT : घटस्फोटाचं कारण ठरतोय मोबाईल

फोन अपडेट करताना कुठलंही अॅप कुणाचं आहे, ते पाहूनच डाउडलोड करणं आवश्यक आहे. अँड्रॉइड अपडेटचं नोटिफिकेशन येतं. ते आलं की, अपडेट करणं सोयीचं आहे. पण अँड्रॉइड स्मार्टफोन जुना झाला किंवा जुन्या व्हर्जनचा घेतलेला असला की काही काळानं अपडेट मिळणं बंद होतं. फोनचं मॉडेल जुनं झाल्यावर Google Play Store त्यावर अपडेट देणं बंद करतं.

मग नव्या मोबाइल मॉडेलसोबत येणारे अपडेट मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. त्या वेळी अशी अॅप ते अपडेट्स देऊ करतात. पण त्यामुळे फेक अ‍ॅपच्या जाळ्यात युजर सहजपणे येतात.

ZDNet मध्ये दिलेल्या एका रिपोर्टमध्ये सिक्युरिटी रिसर्चर आणि मालवेअर अ‍ॅनालिस्ट अलोकसेज क्युप्रिन्स यांनी याबाबत माहिती दिली. नकळतपणे प्ले स्टोरवर अपडेट शोधणाऱ्या लोकांना यासाठी जबाबदार धरणं योग्य नाही. कारण त्यांची मानसिकता समजून अशा प्रकारचा गोंधळ मुद्दाम निर्माण केला जातो. हे होणं सहाजिक आहे. या अ‍ॅपला प्ले स्टोअरवरून काढण्याविषयी गुगलचा सांगण्यात आलं आहे, अशी माहिती क्युप्रिन्स यांनी दिली.

SPECIAL REPORT : आता 'नो पार्किंग'मध्ये कार नेली तर बसेल 10 हजारांचा भुर्दंड

या प्रकारचे अ‍ॅप मालवेअर नसले तरी ते यूजरची माहिती चोरी करतात. त्यामुळे तो एका प्रकारचा गुन्हा आहे. सिक्युरिटी रिसर्चरने या फेक अ‍ॅपवर अपडेटसाठी पैसे भरले. मात्र तराही अपडेटची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. अशी माहिती  सिक्युरिटी रिसर्चर यांनी दिली आहे.

अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा आयफोनला सॉफ्टवेअर अपडेटसाठी कोणत्याही प्रकारचं नवं अ‍ॅप घेण्याची गरज नसते. तुमच्या फोनमध्ये असणाऱ्या  ‘Setting’ ऑप्शनमध्ये जाऊन ‘System Updates’ निवडून ते अपडेट करता येते.

EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

First published: July 6, 2019, 9:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading