मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Samsung लाँच करणार जगातील पहिला स्ट्रेचेबल स्मार्टफोन; हवा तसा बदला डिस्प्लेचा आकार !

Samsung लाँच करणार जगातील पहिला स्ट्रेचेबल स्मार्टफोन; हवा तसा बदला डिस्प्लेचा आकार !

सॅमसंग (Samsung) कंपनी गेल्या काही वर्षांपासून हटके स्मार्टफोन देण्याच्या प्रयत्न करत आहे. आता सॅमसंग स्ट्रेचेबल फोन आणण्याच्या तयारीत आहे. कसा असेल जगातला पहिलावहिला स्ट्रेचेबल स्मार्टफोन जाणून घेऊया.

मुंबई, 17 नोव्हेंबर: सॅमसंगने (Samsung) यापूर्वीच आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनची दुसरी जनरेशन बाजारात आणली आहे. आता कंपनी आपल्या स्ट्रेचेबल फोनबद्दल चर्चेत आहे. कंपनीने एक वर्षापूर्वी स्ट्रेचेबल फोनची घोषणा केली होती. दक्षिण कोरियामध्ये कंपनीचे अध्यक्ष ली जै योंग यांच्याकडे हा रहस्यमय फोन दिसला. कोरिया टाइम्सच्या म्हणण्यानुसार, ली जे योंग यांच्या सोल (South Korea) येथील कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या भेटीदरम्यान हा फोन तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला.

फोनचा आकार 8 इंचांपर्यंत वाढवता येतो?

सॅमसंग आजकाल सामान्य स्मार्टफोनपेक्षा काहीतरी वेगळे स्मार्टफोन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. महत्त्वाचे म्हणजे सॅमसंगने जागतिक बाजारात प्रथम स्ट्रेचेबल स्मार्टफोन लाँच करण्यासाठी पेटंट राइटसाठी नाव नोंदवले आहे. स्ट्रेचेबल फोनबद्दल एक अफवा आहे की 6 इंचाचा हा स्मार्टफोन 8 इंच (ताणून) पर्यंत खेचला जाऊ शकतो, परंतु अजून अशा कोणत्याही बातमीला दुजोरा मिळालेला नाही.

असं सांगितले जातं आहे की कंपनीच्या स्ट्रेचेबल फोनमुळे या कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये दिसणार्‍या क्रीज मार्कची समस्यादेखील सोडवली जाईल आणि यामुळे त्याचे ब्रेकडाउन कमी होईल. पुढच्यावर्षी कंपनी जगातील पहिला स्ट्रेचेबल फोन बाजारात आणू शकते.

असा असतो स्ट्रेचेबल स्मार्टफोन

स्ट्रेचेबल स्मार्टफोन बाजूने अत्यंत बारीक असतो. याचं एक फीचर असं आहे की, याचा डिस्प्ले गरजेनुसार मोठा आणि लहान केले जाऊ शकतो. हा स्मार्टफोन हाताळणं सोपं आहे असं पेटंटमध्ये सांगितलं आहे. या फोनला लांब स्क्रीन असेल जी फोनमध्येच फोल्ड होऊ शकते. पेटंटमध्ये, त्याचे वर्णन लहान आकाराचे आणि कॉम्पॅक्ट स्मार्टफोन म्हणून केले गेले आहे.

कंपनीच्या गॅलेक्सी फोल्डमध्ये दिसणाऱ्या समस्या या नव्या मॉडेलमध्येही दिसू शकतात असे सांगितले जात आहे. अ‍ॅप आणि मीडियाला मोठ्या स्क्रीनवर अधिक उपयुक्त मानलं जात असल्यामुळे त्याची प्रॉडक्शन व्हर्जन थोडं मोठं असू शकतं.

First published:

Tags: Samsung, Smart phone