मुंबई, 01 नोव्हेंबर: स्मार्ट फोन विक्रीमध्ये सॅमसंग (Samsung)ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. Huawei या चिनी कंपनीला मागे टाकत सॅमसंग पुन्हा एकदा नंबर वन ठरली आहे. गेल्या 3 महिन्यांच्या आकडेवारीनुसार सॅमसंगचा मार्केट शेअर 22.7% इतका झाला आहे. गेल्या 3 महिन्यात 80.4 मिलिअन स्मार्ट फोन्स या कंपनीने विकले आहेत. गेल्या तीन महिन्याच्या तुलनेत 2.9% यात वाढ झाली आहे. सध्या सॅमसंग आणि Huawei मध्ये नंबर 1 राहण्यासाठी कांटें की टक्कर सुरू आहे.
सॅमसंग ही कंपनी Huawei ला मागे सारून दुसऱ्यांदा जगातली सर्वात जास्त स्मार्ट फोन्स विकणारी कंपनी ठरली आहे. सॅमसंगने आता दुसऱ्या वेळीही आपलं स्थान स्थिर ठेवलं आहे. सॅमसंगच्या पाठोपाठ Huawei ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. या कंपनीने 51.9% शेअर काबीज केला आहे.
चायनीज कंपनी शाओमी तिसऱ्या स्थानावर आहे. 46.5 दशलक्ष स्मार्टफोनची विक्री केली आहे. शाओमीचा बाजारातील हिस्सा 13.1% आहे. अॅपलला यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. Appleचा बाजारातील हिस्सा 11.8% पर्यंत खाली आला आहे. अॅपलने आपले नवीन स्मार्ट फोन्स उशिरा बाजारात आणल्यामुळे या कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम झाला. असं म्हटलं जात आहे. कोरोनामुळे देखील काही प्रमाणात सर्वच स्मार्ट फोन्सच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.
विवो (Vivo) पाचव्या क्रमांकावर आहे आणि या कंपनीने 31.5 दशलक्ष स्मार्टफोन विकले आहेत. या कंपनीने 8.9% मार्केट शेअर काबीज केला आहे. विवोनंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानावर चिनी कंपन्याच आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung, Smart phone