Home /News /technology /

Samsung M31 vs M51 फीचर्सनुसार कोणता मोबाईल आहे बेस्ट?

Samsung M31 vs M51 फीचर्सनुसार कोणता मोबाईल आहे बेस्ट?

M51 मोबाईल गेमिंग, बॅटरी आणि कॅमेरासाठी हा फोन opp आणि रिअलमीला टफ देईल असा दावा केला जात आहे.

    मुंबई, 10 सप्टेंबर : Samsung M51 मोबाईल लाँच झाला आहे. रियलमी, शाओमी आणि opp ला टक्कर देण्यासाठी M31S पाठोपाठ आता कंपनीने M51 मोबाईल लाँच केला आहे. सर्वात पहिल्यांदा या मोबाईलमध्ये 7000 mAhची बॅटरी मिळणार असून 25 W चा सुपरफास्ट चार्जरही ग्राहकांना मिळणार आहे. आज या मोबाईलचा अमेझॉनवर सेल असणार आहे. M51 मोबाईलमध्ये काय आहे खास? HD सुपर अॅम्युलेटेड डिस्प्ले, 6128 GB इंटरनल मेमरी, 512 जीबीपर्यंत ही मेमरी वाढवता येणार आहे. 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत 1255 मेगापिक्सेल कॅमेऱ्या मिळणार आहे. याशिवाय 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा ग्राहकांना या फोनमध्ये मिळणार आहे. याशिवाय रेडिओ, 4G, LTE सपोर्ट, USB सी टाइप पोर्ट आणि फिंगरप्रिंग सेंसर अशा अनेक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. 25 वॅटचा फास्ट चार्जर ग्राहकांना मिळणार आहे. साधारण 30 ते 40 टक्के फोन चार्ज होण्यासाठी वेळ लागू शकतो त्यानंतर मात्र पटकन चार्जिंग पुढचं होईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हे वाचा-आठवड्याला तीन दिवस सुट्टी; Google कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी M31 आणि M51 मोबाईलमध्ये काय आहे बेस्ट M31 मोबाईलमध्ये Exynos 9611 Octa core तर M51 मोबाईलमध्ये Snapdragon 675 परफोर्मन्स असणार आहे. दोन्हीसाठी 64 MP प्रायमरी कॅमेरा उलब्ध असणार आहे. M51 मोबाईलमध्ये M31च्या तलनेत 1000 mAh बॅटरी जास्त मिळते. M31 ची किंमत साधारण 18 हजारच्या आसपास आहे तर M51 मोबाईलची किंमत 31 हजाराच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. गेमिंग, बॅटरी आणि कॅमेरासाठी हा फोन opp आणि रिअलमीला टफ देईल असा दावा केला जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Samsung, Techonology

    पुढील बातम्या