भारतात 12 कोटी रुपयांचा टीव्ही लाँच, जाणून घ्या असं काय आहे खास

भारतात 12 कोटी रुपयांचा टीव्ही लाँच, जाणून घ्या असं काय आहे खास

भारतीय बाजारात तब्बल 12 कोटी रुपयांचा सर्वात महागडा असा टीव्ही लाँच केला आहे. मायक्रो एलईडी डिस्प्ले असलेला द वॉल ची रेंज सादर करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 डिसेंबर : सॅमसंगने भारतीय बाजारात तब्बल 12 कोटी रुपयांचा सर्वात महागडा असा टीव्ही लाँच केला आहे. मायक्रो एलईडी डिस्प्ले असलेला द वॉल ची रेंज सादर करण्यात आली आहे. यामध्ये तीन स्क्रीन साइज आणि रेशो साइज टीव्ही लाँच केले गेले.

पहिला टीव्ही 146 इंचांचा असून 4k हाय डेफिनेशन असेल. तर दुसरा टीव्ही 219 इंच 6k हाय डेफिनेशनचा आणि तिसरा टीव्ही 292 इंचाचा 8k हाय डेफिनेशनचा असेल. वॉल सिरीज टीव्ही 0.8 पिक्सल पिच टेक्नॉलॉजीसह येतात.

इतक्या महागड्या टीव्हीमध्ये असं काय खास आहे असा प्रश्न नक्कीच पडला असेल. यामध्ये डिस्प्ले डेप्थ 30 एमएमपेक्षा कमी आहे. तीनही टीव्हींमध्ये एआय पिक्चर एनहान्समेंट, हाय ब्राइटनेस, हाय कॉन्ट्रॅस्टचे पर्याय आहेत.

वॉल मायक्रोएलईडीच्या डिस्प्लेमध्ये एआय अपस्केलिंग क्वांटम एचडीआर टेक्नॉलॉजी येते. याचा ब्राइटनेस 2000 नीटस् आणि 120Hz व्हिडिओ रेट आहे.

वॉल सिरीजच्या या टीव्हीच्या किंमती 3.5 कोटी ते 12 कोटी रुपयांपर्यंत आहेत. याची विक्री 5 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार 2020 साठी 25 ते 30 युनिट विक्रीचे लक्ष्य ठरवलं आहे. पुढच्या वर्षी हेच लक्ष्य 100 युनिट इतकं ठेवण्यात आलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 6, 2019, 11:57 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading