Home /News /technology /

Samsung चं स्मार्ट Air Dresser लाँच; हँगरमध्येच साफ होणार कपडे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Samsung चं स्मार्ट Air Dresser लाँच; हँगरमध्येच साफ होणार कपडे, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

या एयर ड्रेसरमध्ये जेट एयर सिस्टम देण्यात आलं आहे. त्याशिवाय तीन एयर हँगर्सही देण्यात आले आहेत. जे कपडे साफ करायचे आहेत, ते या हँगर्सवर ठेवायचे. त्यानंतर मशीन आपोआप कपडे साफ करून रिफ्रेश करेल.

  नवी दिल्ली, 23 डिसेंबर : पावसाळा आणि थंडीच्या दिवसांत अनेक लोकांना घरात कपडे सुकवण्यासाठी मोठ्या समस्या होतात. पण आता सॅमसंग कंपनी अनेकांची ही समस्या दूर करणार आहे. आता कोणत्याही मोसमात कपडे सुकवण्यासाठी, कपडे साफ करण्यासाठी काळजी करावी लागणार नाही. कारण सॅमसंगने (Samsung)आपल्या ग्राहकांसाठी स्मार्ट क्लोदिंग केयर सोल्यूशन डिवाईस एयर ड्रेसर (Air Dresser) भारतात लाँच केलं आहे. याच्या मदतीने कपडे सहजपणे साफ होण्यासाठी, सुकण्यासाठी मदत होणार आहे. Air Dresser चं वैशिष्ट्य - या एयर ड्रेसरमध्ये जेट एयर सिस्टम देण्यात आलं आहे. त्याशिवाय तीन एयर हँगर्सही देण्यात आले आहेत. जे कपडे साफ करायचे आहेत, ते या हँगर्सवर ठेवायचे. त्यानंतर मशीन आपोआप कपडे साफ करून रिफ्रेश करेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे मशीन कपड्यांच्या सफाईसह लपलेल्या जंतूंचाही नाश करते. तसंच या मशिनचा आवाज आणि व्हॉयब्रेशनही अतिशय कमी आहे.

  (वाचा - ...अन्यथा अडचणी वाढणार;31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा हे काम,परिवहन विभागाची माहिती)

  हे एयर ड्रेसर सॅमसंग शॉप किंवा ऑफिशियल वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. त्याशिवाय 24 डिसेंबर 2020 नंतर हे अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

  (वाचा - भारतात Nokia चा Smart AC लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत आणि फीचर्स)

  किती असेल किंमत - सॅमसंगने या एयर ड्रेसरची किंमत 110000 रुपये इतकी सांगितली आहे. लॉन्चिंग ऑफरअंतर्गत कंपनी या मशीनवर 10 हजार रुपयांची सूट देणार आहे. त्यामुळे आता हे मशीन लाखपर्यंत खरेदी करता येणार आहे. त्याशिवाय 18 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवरही, स्मार्ट क्लोदिंग केयर सोल्यूशन डिवाईस एयर ड्रेसर खरेदी करता येणार आहे.

  (वाचा - आता Apple ची कारही येणार; मिळेल अ‍ॅडव्हान्स बॅटरी टेक्नोलॉजी)

  या एयर ड्रेसरच्या मदतीने कपड्यांची चांगली देखभाल होते, त्याशिवाय यात व्हायरसही पूर्णपणे संपुष्ठात येत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Samsung

  पुढील बातम्या