घरातील अस्वच्छता शोधून साफ करतील Samsung चे Robot Vacuum Cleaners, स्मार्टफोनद्वारेच होणार कंट्रोल

सॅमसंग कंपनीने जेटबॉट सीरिजचे (Jetbot Series) तीन रोबॉटिक व्हॅक्युम क्लिनर्स (Vaccum Cleaners) सादर केले आहेत. या व्हॅक्युम क्लिनर्सचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने ते नियंत्रित करू शकतात.

सॅमसंग कंपनीने जेटबॉट सीरिजचे (Jetbot Series) तीन रोबॉटिक व्हॅक्युम क्लिनर्स (Vaccum Cleaners) सादर केले आहेत. या व्हॅक्युम क्लिनर्सचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स आपल्या स्मार्टफोनच्या साहाय्याने ते नियंत्रित करू शकतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 15 जून: सॅमसंग (Samsung) या तंत्रज्ञान विश्वातल्या दिग्गज कंपनीने आतापर्यंत स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर, एसी, वॉशिंग मशीन, स्मार्ट टीव्ही अशी घरगुती वापराची अनेक उपकरणं (Home Appliances) तयार केली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली इलेक्ट्रिक उपकरणं (Electric Devices) तयार करण्यासाठी सॅमसंग कंपनी ओळखली जाते. आता आपला हाच दर्जा कायम ठेवून सॅमसंग कंपनीने जेटबॉट सीरिजचे (Jetbot Series) तीन रोबॉटिक व्हॅक्युम क्लिनर्स (Vaccum Cleaners) सादर केले आहेत. या व्हॅक्युम क्लिनर्सचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्स आपल्या स्मार्टफोनच्या (Smartphone) साहाय्याने ते नियंत्रित करू शकतात. तसंच, याद्वारे घराची साफसफाई वेगाने आणि सहजपणे करणं शक्य आहे. Samsung JetBot 80, Samsung JetBot 80+ आणि Samsung JetBot 95 AI+ अशी तीन मॉडेल्स कंपनीने या सीरिजमध्ये दाखल केली आहेत. फीचर्स - JetBot 80+ आणि JetBot 95 AI+ या दोन मॉडेल्समध्ये सॅमसंग कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हॅक्युम क्लिनर संक्शन स्टेशन अशी खास फीचर्स दिली आहेत. त्यात दिलेल्या Retractable LiDAR या सेन्सरमुळे व्हॅक्युम क्लिनरला या गोष्टीचा पत्ता लागतो, की घराचा कोणता कोपरा सर्वांत खराब झाला आहे आणि साफसफाईची गरज कुठे जास्त आहे. ती माहिती मिळाल्यावर व्हॅक्युम क्लिनर घराचा तो विशिष्ट कोपरा अधिक चांगल्या पद्धतीने स्वच्छ करतो.

(वाचा - UIDAI: कुणी तुमचं Aadhaar Card तर वापरत नाही ना? घरबसल्याच ठेवा वॉच)

JetBot 95 AI+ या मॉडेलमध्ये आणखीही एका वैशिष्ट्याचा समावेश आहे. हा व्हॅक्युम क्लिनर साफसफाई करत असताना मध्ये कोणी व्यक्ती आल्यास तो थांबतो आणि आपला मार्ग आपणहून बदलतो. हे व्हॅक्युम क्लिनर्स सॅमसंगच्या SmartThings अॅपच्या साहाय्याने नियंत्रित केले जाऊ शकतात. त्याद्वारे रोजची साफसफाईची कामं निश्चित केली जाऊ शकतात.

(वाचा - बॅगेमध्ये घेऊन जाता येईल असा Xiaomi चा पोर्टेबल हँड फॅन, किंमत केवळ 750 रुपये)

सध्या सॅमसंग कंपनीने जेटबॉट 80 सीरिजचे हे व्हॅक्युम क्लिनर्स युरोपीय (Europe) बाजारपेठेत सादर केले आहेत. लवकरच ते भारत आणि अन्य देशांत सादर केले जाणार आहेत. जेटबॉट सीरिजच्या बेसिक मॉडेलची युरोपातली किंमत भारतीय रुपयांत 44 हजार 249 रुपये एवढी आहे. जेटबॉट 80+ या मॉडेलची किंमत 61 हजार 984 रुपये आणि जेटबॉट 95 AI+ या मॉडेलची किंमत सुमारे 1.33 लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेतही हे व्हॅक्युम क्लिनर्स याच किमतीला सादर केले जाऊ शकतात.
Published by:Karishma Bhurke
First published: