मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुम्हीही Samsung Smartphone वापरता का? लगेच करा हे काम, अन्यथा डिलीट होईल संपूर्ण डेटा

तुम्हीही Samsung Smartphone वापरता का? लगेच करा हे काम, अन्यथा डिलीट होईल संपूर्ण डेटा

कंपनीने आपली इमेज बॅकअप सर्विस (Samsung Image Backup Service) बंद केली आहे, जो सध्या सॅमसंग क्लाउडचा भाग आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत युजर्सचे सर्व फोटो डिलीट केले जातील असं कंपनीने म्हटलं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : जर तुम्ही सॅमसंग युजर (Samsung User) असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सॅमसंगने जगभरातील युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. कंपनीने युजर्सला त्यांचे फोटो सॅमसंग क्लाउडमध्ये सेव्ह (Samsung Cloud) करण्याचं सांगितलं आहे. कंपनीने आपली इमेज बॅकअप सर्विस (Samsung Image Backup Service) बंद केली आहे, जो सध्या सॅमसंग क्लाउडचा भाग आहे. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत युजर्सचे सर्व फोटो डिलीट केले जातील असं कंपनीने म्हटलं आहे.

सॅमसंग क्लाउड युजर्सला एक लिमिटेड स्टोरेज देतं. ज्याचा कॉन्टॅक्स, कॅलेंडरसह नोट्स सिंक करण्यासाठी वापर केला जातो. त्याशिवाय युजर्सला त्यांच्या गॅलरीतील फोटोही सिंक करण्याची परवानगी मिळते. परंतु आता सॅमसंगने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कंपनीकडून देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर युजर्स आपले फोटो अॅक्सेस करू शकत नाही. परंतु युजर्सचं कॅलेंडर, कॉन्टॅक्स सिंक राहतील. ही सुविधा बंद होत असल्याने कंपनीने युजर्सला त्यांची माहिती डाउनलोड करण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला आहे.

Truecaller विसरा,आता वापरा देशी BharatCaller App;प्रायव्हसीसह जबरदस्त वैशिष्ट्यं

सॅमसंगने युजर्सला दोन ग्रुपमध्ये विभागलं आहे, की कोणत्या युजर्सचा डेटा कधी डिलीट केला जाईल. ग्रुप 1 मधील डेटा 30 सप्टेंबरपर्यंत डिलीट केला जाईल. तर ग्रुप 2 साठी डेटा डाउनलोड करण्याची मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत असेल. परंतु ग्रुप 1 आणि ग्रुप 2 बाबत कोणतीही स्पष्टता दिली नसल्याने, युजर्सनी 30 सप्टेंबरपर्यंत आपला डेटा डाउनलोड करणं फायद्याचं ठरेल.

Amazon च्या नावाने Telegram वर महिलेला 2.33 लाखांचा गंडा, बोरिवलीतील घटना

सॅमसंग फोनमधून फोटो डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग ओपन करा आणि सॅमसंग क्लाउड सर्च करा. त्यानंतर Download My Data, Sync Apps, Backup Data, Data Restore आणि Delete Backup सारखे पर्याय दिसतील. यातील पहिल्या पर्यायाची निवड करा, त्यानंतर सर्व फोटो डाउनलोड होतील. जर युजरने OneDrive अकाउंटशी कनेक्ट केलं असेल, तर ते Microsoft च्या क्लाउड स्टोरेजमध्ये आपल्या फोटोचा बॅकअप घेऊ शकतात. यासाठी 5GB स्पेस फ्री असेल, त्यानंतर स्टोरेजचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतील.

First published:

Tags: Samsung