या फोनची घडी उघडा आणि करा 2 वेगवेगळी कामं, Samsung Galaxy Z Flip चं बुकिंग सुरू

या फोनची घडी उघडा आणि करा 2 वेगवेगळी कामं, Samsung Galaxy Z Flip चं बुकिंग सुरू

स्मार्टफोन वापरताना आपण वेगवेगळी अॅप वापरतो. त्याचबरोबर ई मेल आणि व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर एकाच वेळी असतो. त्यामुळे या फोनवर हे मल्टीटास्कींग चांगल्या पद्धतीने करता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : सॅमसंग (Samsung)ने घडीचा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. Samsung Galaxy Z Flip असं याचं नाव आहे. सॅमसंग कंपनी या महिन्यात हा फोन लाँच करू शकते. त्याची किंमत अंदाजे 1 लाख 10 हजार रुपये असेल. या महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने हा फोन अमेरिकी बाजारपेठेत लाँच केला. आता 21 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून सॅमसंग ऑनलाइन स्टोअर्स आणि निवडक स्टोअर्समध्ये याचं बुकिंग सुरू होईल. 26 फेब्रुवारीपासून ग्राहकांना हा फोन घेता येईल.

असा आहे Samsung Galaxy Z Flip फोन

Samsung Galaxy Z Flip फोनमध्ये 6.7 इंचांची मुख्य स्क्रीन आहे. या फोनची घडी उघडली की 2 वेगवेगळ्या भागात तो काम करतो. या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी कॅमेरा 10 मेगापिक्सेल आहे. मिरर पर्पल, मिरर ब्लॅक आणि मिरर गोल्ड या रंगात हा फोन उपलब्ध होईल. हा फोन कॉम्पॅक्ट आणि आकर्षक स्वरूपात उपलब्ध होईल.

(हेही वाचा : सरकारच्या तिजोरीपेक्षा पाचपट सोनं! जगभरात भारताचा नंबर कितवा?)

स्मार्टफोन वापरताना आपण वेगवेगळी अॅप वापरतो. त्याचबरोबर ई मेल आणि व्हॉट्सअॅप, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर एकाच वेळी असतो. त्यामुळे या फोनवर हे मल्टीटास्कींग चांगल्या पद्धतीने करता येईल. भारतात आजपासून बुकिंग सुरू असलं तरी 26 फेब्रुवारीपासून हा फोन ग्राहकांना घेता येणार आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्या हायटेक लोकांसाठी हा फोन खूपच उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलसाठीही या फोनचा चांगला उपयोग होईल.

(हेही वाचा : डोळे दाखवा आणि पेमेंट करा, अशी असेल देशाची नवी पेमेंट सिस्टम)

=======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 06:42 PM IST

ताज्या बातम्या