मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Samsung Galaxy S21 : कॅशबॅक, शॉप व्हाऊचर, फ्री प्रोडक्ट; प्री-बुकिंगवर धमाकेदार ऑफर्स

Samsung Galaxy S21 : कॅशबॅक, शॉप व्हाऊचर, फ्री प्रोडक्ट; प्री-बुकिंगवर धमाकेदार ऑफर्स

samsung Galaxy S21 सीरिजमध्ये तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. या नव्या सीरिजमधल्या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग (Prebooking) सुरू झालं आहे.

samsung Galaxy S21 सीरिजमध्ये तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. या नव्या सीरिजमधल्या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग (Prebooking) सुरू झालं आहे.

samsung Galaxy S21 सीरिजमध्ये तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. या नव्या सीरिजमधल्या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग (Prebooking) सुरू झालं आहे.

    मुंबई, 15 जानेवारी : सॅमसंगने 'गॅलॅक्सी अनपॅक्ड 2021' (Galaxy Unpacked 2021) या बहुचर्चित कार्यक्रमात गॅलॅक्सी एस 21 स्मार्टफोनची सीरिज सादर केली. त्यात गॅलॅक्सी एस 21 (Galaxy S21), गॅलॅक्सी एस 21 प्लस (Galaxy S 21+) आणि गॅलॅक्सी एस 21 अल्ट्रा (Galaxy S 21 Ultra) अशी तीन मॉडेल्स सादर करण्यात आली. या नव्या सीरिजमधल्या स्मार्टफोनचं प्री-बुकिंग (Prebooking) 15 जानेवारीपासून सॅमसंगची एक्स्क्लुझिव्ह स्टोअर्स, रिटेल स्टोअर्स, सॅमसंग डॉट कॉम आणि आघाडीच्या ऑनलाइन पोर्टल्सवरून सुरू झालं आहे. या फोनसह सॅमसंगनं गॅलॅक्सी बड्स, प्रो इअरबड्स, गॅलॅक्सी स्मार्ट टॅग आणि गॅलॅक्सी स्मार्ट टॅग प्लस हे प्रोडक्ट लाँच केलं आहे.

    प्री-बुकिंग करणाऱ्या सर्व ग्राहकांना गॅलॅक्सी स्मार्ट टॅग (Galaxy Smart Tag) मोफत देण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. तसंच, या ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंतचं ई-शॉप व्हाउचरही देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. या ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनसोबत गॅलॅक्सी वॉच अॅक्टिव्ह टू किंवा गॅलॅक्सी बड प्लस आणि ट्रॅव्हल अडाप्टर यांचा कॉम्बो यांपैकी एक काही तरी मिळू शकतं, असंही कंपनीने सांगितल्याचं फर्स्टपोस्टच्या वृत्तात म्हटलं आहे.

    एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो किंवा पाच हजार रुपयांपर्यंतचा अपग्रेड बोनस मिळवण्याचा पर्याय मिळू शकतो. स्मार्टफोनचं प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 25 जानेवारीपासून ते मिळायला सुरुवात होईल. 29 जानेवारीपासून स्मार्टफोन्सची अन्य ग्राहकांसाठी विक्री सुरू होईल.

    हे वाचा - Samsung Galaxy S21 सीरीजचे स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

    सॅमसंग गॅलॅक्सी एस 21 -

    8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.

    8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 73 हजार 999 रुपये आहे .फँटम व्हायोलेट, व्हाइट, पिंक आणि ग्रे या कलर्समध्ये उपलब्ध

    सॅमसंग गॅलॅक्सी एस 21 प्लस -

    8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 81 हजार 999 रुपये आहे.

    8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 85 हजार 999 रुपये आहे .फँटम व्हायोलेट, सिल्व्हर आणि ब्लॅक या कलर्समध्ये उपलब्ध

    हे वाचा - जिन्यावरून कोसळताच धावून आली Alexa; बॉडीबिल्डरचा जीव वाचवला

    सॅमसंग गॅलॅक्सी एस 21 अल्ट्रा

    12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत एक लाख 5 हजार 999 रुपये आहे.

    16 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत एक लाख 16 हजार 999 रुपये आहे .फँटम ब्लॅक आणि सिल्व्हर या कलर्समध्ये उपलब्ध

    First published:
    top videos

      Tags: Samsung, Samsung galaxy, Technology