Home /News /technology /

Samsung Galaxy S10 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy S10 Lite भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंग कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं वेगवेगळे मोबाईल लाँच केला आहे.

    मुंबई, 23 जानेवारी: सॅमसंग कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं वेगवेगळे मोबाईल लाँच करत असते. भारतीय बाजारपेठेत प्रीमियन स्मार्टफोन गॅलेक्सी S10 Lite फोन आज लाँच करण्यात येणार आहे. भारतामध्ये फ्लिपकार्टवर हा फोन तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कसा आहे सॅमसंगचा स्मार्टफोन आणि काय आहेत त्याचे फिचर्स, किंमत जाणून घ्या. Samsung S10 Lite मोबाईलमध्ये तुम्हाला खास फीचर्स मिळणार आहेत. या फोनमध्ये 6.70 इंचाचा full HD आणि सुपर अॅम्युलेटेड इंफिनिटी-ओ टचक्रीन डिस्प्ले मिळणार आहे.या फोनमध्ये तुम्हाला नोट 10 सारखंच याचं स्ट्रक्चर असणार आहे. मोबाईलमध्ये तीन कॅमेरा असणार आहेत. 48, 12 आणि 5 मेगापिक्सेल कॅमेरा मिळणार आहे. 48 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर 5 मेगापिक्सल मायक्रो लेंस मिळणार आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना 32 मेगापिक्सेल कॅमेर देण्यात आला आहे. याशिवाय सुपर स्टडी OIS मोड आणि व्हिडिओसाठी उत्तम फीचर्स या फोनमध्ये मिळणार आहेत. हेही वाचा-Whatsapp स्टेटसचे फोटो, Video डाउनलोड करण्यासाठी वापरा ही ट्रिक यामध्ये वापरण्यात आलेले मायक्रे लेन्स मुंगी एवढा आकाराच्या प्राण्यांचे फोटोही अगदी क्लिअर आणि उत्तम टिपू शकता. यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 855 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त मेमरी असणारे गेम्सही अगदी सहज खेळू शकता. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी मिळणार आहे. तुम्ही SD कार्ड वापरून एक हजार GB मेमरी वाढवू शकता अशी सुविधा करण्यात आली आहे. या मोबाईलमध्ये android os 10 अपडेट वर्जन मिळणार असल्यानं सिक्युरिटी आणि जादा फीचर्सचा लाभ ग्राहकांना घेता येईल. या मोबाईलमध्ये ग्राहकांना बॅटरी 4500 एमएच बॅटरी मिळणार आहे. तर अवघ्या 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तुम्हाला पूर्ण दिवस बॅटरी बॅकअप मिळू शकतो असा कंपनीचा दावा आहे. या फोनची किंमत साधारण 53 हजार रुपयांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा-सावधान! डेटिंगसाठी Tinder वापरत असाल तर तुमची वैयक्तिक माहिती होतेय लीक
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Samsung, Samsung galaxy, Techonology

    पुढील बातम्या