सावधान! फिंगरप्रिंट लॉकचा मोबाइल वापरताय? कोणाच्याही बोटानं होतोय अनलॉक

सावधान! फिंगरप्रिंट लॉकचा मोबाइल वापरताय? कोणाच्याही बोटानं होतोय अनलॉक

फिंगरप्रिंट लॉकसाठी बायोमेट्रिक डिटेल स्टोअर करण्यात आलेलं नाही त्या व्यक्तीच्या बोटानंही फोन अनल़ॉक झाल्यानंतर हा बग समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : पासवर्डपेक्षा फिंगरलॉक किंवा फेसलॉक अधिक सुरक्षित म्हणून अनेकजण असे फिचर असलेले फोन घेतात. पण आता सॅमसंगच्या एस10 मध्ये एक अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये बग आल्यानं गॅलेक्सी एस10, एस10 प्लस आणि गॅलेक्सी नोट 10 सिरीजचे फिंगरप्रिंट लॉक इतर कोणालाही उघडता येत होतं.

सॅमसंगने या फ्लॅगशिप फोनमध्ये एका बगमुळे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला अडचण येत आहे. यामुळे कोणालाही कोणाच्याही मोबाइलचं फिंगरप्रिंट लॉक सहजपणे उघडता येत होतं. दरम्यान, सॅमसंग बग फिक्स करण्याची तयारी करत आहे.

वाचा : आता Alexa भरणार तुमचं वीज, पाणी, केबलचं बिल; काय असेल प्रक्रिया?

फिंगरप्रिंट लॉकमध्ये आलेल्या बगनंतर सॅमसंगने ग्राहकांना सांगितलं की, जोपर्यंत कंपनीकडून अपडेट दिलं जात नाही तोपर्यंत सीलिकॉन कव्हरचा वापर करा. फिंगरप्रिंट सेन्सरमध्ये असलेल्या बगला काढून टाकण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. पुढच्या आठवड्यात अपडेट जारी करण्यात येईल.

वाचा : कोट्यवधी ग्राहकांचा मोबाइल क्रमांक होऊ शकतो बंद, 31 ऑक्टोबरपर्यंतचीच आहे मुदत

सॅमसंग गॅलेक्सी एस10 ला दुसऱ्याच व्यक्तीने फिंगरप्रिंटचा वापर करत अनलॉक केल्याचं वृत्त 'सन'ने दिलं आहे. त्या व्यक्तिच्या फिंगरप्रिंटच्या डिटेल्स बायोमेट्रिक सिस्टिममध्ये स्टोअर झाला नव्हत्या. तरीही फोन लॉक झाल्यानं यामध्ये बग असल्याचं समोर आलं होतं.

वाचा : सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

वाचा : सावधान! गुगलची 'ही' सर्विस वापरताय, बॅटरीसह स्क्रीन होऊ शकते खराब

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: technology
First Published: Oct 19, 2019 05:40 PM IST

ताज्या बातम्या