Home /News /technology /

बजेट स्मार्टफोन! 5000 रुपयांहून कमी किंमतीत मिळतात हे 4G smartphone; पाहा फीचर्स

बजेट स्मार्टफोन! 5000 रुपयांहून कमी किंमतीत मिळतात हे 4G smartphone; पाहा फीचर्स

आता कमी बजेटमध्ये चांगले फिचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन 5000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत.

    मुंबई, 1 ऑक्टोबर : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? पण बजेट कमी असल्यास, आता कमी बजेटमध्ये budget smartphone चांगले फिचर्स असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. हे स्मार्टफोन 5000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. सॅमसंग ते नोकियापर्यंत या रेंजमधील अनेक स्मार्टफोन बाजारात आहेत. विशेष बाब म्हणजे हे फोन 4G कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहेत. जाणून घ्या 5000 रुपयांहून कमी किंमतीतील काही स्मार्टफोन - Nokia 1 - बजेट सेगमेंटमध्ये नोकिया 1 अतिशय लोकप्रिय स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 4299 इतकी आहे. या फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. फोटोजसाठी यात 5 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनला 4.5 इंची FWVGA IPS डिस्प्ले, MT6737M Quad Core 1.1 GHz प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला 2150mAh रिमूवेबल बॅटरी आहे. Samsung Galaxy M01 - हा स्मार्टफोन ई प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या ऑफर अंतर्गत 4999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. यात 5.3 इंची डिस्प्ले, 3000mAh बॅटरी, 1.5GHz मीडियाटेक MT6739WW क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. 1 जीबी रॅम आणि 16 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे. मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. Lava Z41 - बजेट स्मार्टफोनमध्ये Lava Z41हा चांगला पर्याय आहे. या फोनमध्ये क्वॉड-कोर स्प्रेडट्रम प्रोसेसर, 5 इंची डिस्प्ले, 2500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हे वाचाGoogle चा Pixel 5, Pixel 4a 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स Xiaomi Redmi Go - 5 हजारच्या बजेटमध्ये Redmi Go चांगला स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 4499 रुपये इतकी आहे. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. 8 मेगापिक्सल प्रायमरी आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 5 इंची एचडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर, 3000mAh बॅटरी देण्यात आली आहे. Zen Admire Shine - Zenचा हा स्मार्टफोन 4999 रुपयांत उपलब्ध आहे. फोनला 4 इंची डिस्प्ले, 1750mAh बॅटरी, 1.5GHz Spreadtrum प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे. 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 2 मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Mobile, Smartphone

    पुढील बातम्या