खूशखबर! Samsung Galaxy Fold आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

खूशखबर! Samsung Galaxy Fold आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नव्या फीचर्जसह मल्टियुजर Samsung Galaxy Fold फोन भारतात आज लाँच होणार

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर: वापरण्यासाठी सर्वात सोपा आणि हॅण्डी फोन म्हणून सॅमसग फोनची ओळख आहे. भारतात एकीकाळी सगळ्यात लोकप्रिय असणारे मोबाईल हे सॅमसंगचे होते. सॅमसंग आपल्या ग्राहकांसाठी कायम चांगले फीचर्स घेऊ येत असते. यावेळी सॅमसंगने  चक्क फोल्डिंग फोन ही कॉन्सेप्ट आणली आहे. Samsung Galaxy Fold आज भारतामध्ये लाँच होणार आहे. हा फोन तुम्हाला रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध होणार आहे. याशिवाय तुम्ही प्री बुकिंग करून फोन खरेदी करू शकता. साऊथ कोरियातील सॅमसंग ऑफिसकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. सॅमसंगच्या पेजवर त्याचा लाँचिंग सोहळा पाहू शकता.

Samsung Galaxy Fold मोबाईलची किंमत

अहवालानुसार मोबाईलची किंमत एक लाख रुपयांच्या वर असेल असा अंदाज आहे. दीड लाखापासून साधारण या मोबाईलची सुरुवात होईल आणि 1 लाख 75 हजार जास्तीत जास्त किंमत असेल असा एक अंदाज वर्तवला जात आहे. सॅमसंगच्या सगळ्या सिरिजमधील आतापर्यंतचा हा सगळ्यात महाग फोन आहे. जगभरात पहिल्यांदाज सॅमसंगने फोल्डेड मोबाईल (First Foldable Smartphone) ही संकल्पना आणली आहे. या फोनमध्ये तुम्हाला दोन डिस्प्ले मिळणार आहेत. जेव्हा तुम्हा या फोनला स्मार्ट मोडमध्ये वापराल तेव्हा याचा स्क्रिन साइज 4.6 इंच असेल आणि टॅबलेट मोड वापरला तर 7.3 स्क्रिन साइज असेल ज्याचा आस्पेक्ट रेशो जवळपास 4:2:3 तर रिझोलूशन 1536x2152 आहे. फोल्ड केल्यावर मोबाईलवर 840x1960 रेजोलूशन डिस्प्ले दिेसेल. या मोबाईलमध्ये 7 NMचा प्रोसेसर आणि 12 GB इनबिल्ड रॅम तुम्हाला मिळणार आहे.

Galaxy Fold मोबाईलमध्ये 4G LTE आणि 5G वेरिएंट उपलब्ध आहेत. भारतात फक्त 4G असणाऱा मोबाईल लाँच होणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत दोन विंडोमध्ये एकावेळी मल्टीटास्कींग करता येत होतं. Galaxy Fold मध्ये तुम्हाला एकावेळी 3 विंडोमध्ये मल्टीटास्कींगची सुविधा उपलब्ध होणार आहे. एकावेळी तुम्ही तीन अॅप वापरु शकता उदा. युट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम. Galaxy Fold मॉडेलमधील प्रत्येक स्क्रीन वेगवेगळं काम करणार आहे. त्यामुळे मोबाईल फोल्ड करून तुम्ही वापरू शकता.

Samsung Galaxy Fold मोबाईलचे फिचर्स

12 GB रॅम 512 GB स्टोरेज, तुम्हाला स्टोरेज वाढवण्याचा पर्याय यामध्ये उपलब्ध नसेल.

साइड फिंगरप्रिंट स्कॅनर

4380 mAH मोबाईलची बॅटरी

पावरलेस पावर शेअरचा उत्तम पर्याय

10 MP front कॅमेरा, 16 MP12 MP12 MP Real कॅमेरा

8. 55 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर अशा पद्धतीने फीचर्सचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

सॅमसंगने आतापर्यंत अनेक सिरिज मार्केटमध्ये लाँच केल्या मात्र फोल्ड मोबाईल फोन तयार करणारी जगातील एकमेव कंपनी आहे. हा फोन आधी जागतीक मार्केटमध्ये लाँच केल्यानंतर काही काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यानुसार फोनमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यानं पुन्हा सॅमसंग कंपनीने हा फोन अपडेट मॉडेल, रॅम आणि सॉफ्टवेअरसह रिलाँच केला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

Published by: Kranti Kanetkar
First published: October 1, 2019, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading