मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /6000 mAh बॅटरी आणि sAMOLED डिस्प्लेसह सॅमसंगचा सर्वांत स्वस्त स्मार्टफोन लॉन्च; पाहा किंमत

6000 mAh बॅटरी आणि sAMOLED डिस्प्लेसह सॅमसंगचा सर्वांत स्वस्त स्मार्टफोन लॉन्च; पाहा किंमत

हा फोन 4GB आणि 6GB अशा दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यासोबत ग्राहकांना 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

हा फोन 4GB आणि 6GB अशा दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यासोबत ग्राहकांना 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

हा फोन 4GB आणि 6GB अशा दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यासोबत ग्राहकांना 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

  नवी दिल्ली, 6 जुलै : सॅमसंगने बजेट रेंजमधला सॅमसंग गॅलेक्सी F22 (Samsung Galaxy F22) हा नवा स्मार्टफोन (SmartPhone) नुकताच सादर केला आहे. हा फोन सॅमसंग ऑनलाइन स्टोअर (Samsung Online Store) आणि फ्लिपकार्टच्या (Flipkart) माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनमध्ये MediaTek Helio G80 SoC आणि क्वॉड कॅमेरा सेटअप यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसंच या फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आणि 90 Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या पुढच्या बाजूला वॉटर ड्रॉप स्टाइलचा नॉच देण्यात आला असून, खालील बाजूला लहानसं फोल्डिंग आणि कॅमेरा मॉड्युल चौकोनी शेपमध्ये देण्यात आलं आहे. sAMOLED डिस्प्ले असलेला हा सर्वांत किफायतशीर फोन आहे, असं कंपनीनं फ्लिपकार्ट बॅनरवर लिहिलं आहे.

  कंपनीने या फोनची प्रारंभिक किंमत 12,499 रुपये ठेवली आहे. ही किंमत 4GB+64GB मॉडेलची आहे. तसंच या फोनच्या 6GB+128GB व्हॅरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. ग्राहकांना हा फोन डेनिम ब्लू आणि डेनिम ब्लॅक या दोन रंगांच्या (Colours) पर्यायांत उपलब्ध असेल. या फोनचा पहिला सेल फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरवर असेल. हा सेल 13 जुलैला दुपारी 12 वाजता सुरू होईल. प्रीपेड ट्रान्झॅक्शन केल्यास फोनवर 1,000 रुपयांची सूट मिळणार आहे.

  ‘टूशे’ची नवी इलेक्ट्रिक सायकल बाजारात लाँच; बॅटरी चार्ज केल्यानंतर 80 किलोमीटरपर्यंत धावणार

  सॅमसंग गॅलक्सी F22ची वैशिष्ट्यै

  सॅमसंग गॅलक्सी F22 या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.4 इंच एचडी असून, इन्फिनिटी U-सुपर AMOLED प्रकारचा आहे. हा डिस्प्ले 1600*720 पिक्सल रिझॉल्युशनसह येतो. याचा अस्पेक्ट रेशो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हीलियो G80 हा प्रोसेसर असून, तो 12 nm प्रोसेसरवर आधारित आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड OneUI कोर 3.1 सह आहे.

  हा फोन 4GB आणि 6GB अशा दोन व्हॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यासोबत ग्राहकांना 64GB आणि 128GB असे इंटर्नल स्टोरेजचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. तसंच युजर मायक्रो एसडी कार्डचा वापर करून मेमरी 256GBपर्यंत वाढवू शकतात.

  48 मेगापिक्सेलचा कॅमेरा

  गॅलेक्सी F22मध्ये अपर्चर f/1.8 सह 48 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासह मागच्या बाजूला 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सेल डेप्थ आणि 2 मेगापिक्सेल मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या पुढच्या बाजूला f/2.0 सह 13 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  पॉवरसाठी या फोनमध्ये 6000 mAhची दमदार बॅटरी आहे. ही बॅटरी 15 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युएल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5, जीपीएस/ग्लोनास/बायदू, यूएसबी, टाइप सी यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

  First published:
  top videos

   Tags: Samsung, Smartphone