Home /News /technology /

Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन; 4 कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत

Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन; 4 कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स, पाहा किंमत

कंपनीनं बजेट रेंज (Budget Range) फोन आणि मिड-रेंज (Mid Range) फोन आणले असून फ्लिपकार्टवर (Flip cart) या फोनच्या खरेदीवर डिस्काउंटही मिळत आहेत.

नवी दिल्ली, 28 जून : स्मार्टफोनच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेली सॅमसंग (Samsung) नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. सर्व आर्थिक स्तरांतील ग्राहकांना परवडतील असे फोन आणण्यावर कंपनीचा भर असतो. त्यामुळे अवघ्या दोन ते तीन हजार रुपये किमतीच्या साध्या फोन्ससह अत्याधुनिक फीचर्स असलेले लाखो रुपयांचे फोन्सही कंपनीने लाँच केले आहेत. त्यामुळे सर्व श्रेणीतील सॅमसंग मोबाईल हँडसेट्स (Mobile Handsets) खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळते. याशिवाय कंपनी आपल्या फोन्सवर आकर्षक सवलतीही देत असते. अलीकडेच कंपनीनं बजेट रेंज (Budget Range) फोन आणि मिड-रेंज (Mid Range) फोन आणले असून फ्लिपकार्टवर (Flip cart) या फोनच्या खरेदीवर डिस्काउंटही मिळत आहेत. फ्लिपकार्टवर सॅमसंग गॅलेक्सी एफ 12 (Samsung Galaxy F12) स्मार्टफोनवर आकर्षक सवलत मिळत आहे. याच्या बेस वेरिएंटची किंमत 10 हजार 999 रुपये असून, 128 जीबी वेरिएंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. त्यावर फ्लिपकार्टकडून 1000 रुपयांची सवलत मिळत आहे. आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे (ICICI Bank Card) ग्राहक याचा फायदा घेऊ शकतात. हा फोन Sea Green, Sky Blue आणि Celestial Black कलरमध्ये उपलब्ध आहे. फीचर्सच्या तुलनेने याची किंमतही कमी आहे. सर्वात हलका आणि पातळ स्मार्टफोन; 64 MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स,पाहा किंमत Samsung Galaxy F12 फीचर्स - - 6.5 इंची एचडी + इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले - कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 - एक्सीनॉस 850 प्रोसेसर - 4 जीबी रॅमसह फोनमध्ये 64 जीबी + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज - अँड्रॉईज 11 बेस्ड वन यूआय 3.1 कस्टम स्किन - फिंगरप्रिंट सेन्सर - 6000 mAh बॅटरी - 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह Vivo चा नवा 5G स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स कॅमेरा सेटअप - Samsung Galaxy F12 मध्ये क्वाड कॅमेरा (Quad Camera) सेटअप देण्यात आला आहे. त्याच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सल डेप्थ असलेला मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी गॅलेक्सी एफ 12 मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि वाइडवाइन एल 1 सर्टीफिकेशन मिळतं. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएससारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.
First published:

Tags: Samsung, Samsung galaxy, Smartphone

पुढील बातम्या