Samsung Galaxy A51 आज लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Samsung Galaxy A51 आज लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

oppo 15 आणि शाओमीला टक्कर देणार Samsung Galaxy A51, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी: Samsung कंपनी आपल्या ग्राहकांसाठी आज खास मोबाईल लाँच करत आहे. शाओमी आणि ओपोसोबतच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी Samsung सातत्यानं नवीन मॉडेल्स ग्राहकांसाठी अॅडव्हान्स फीचर्समध्ये लाँच करत असते. Samsungने M आणि A सिरिज लाँच केली आहे. A50 मोबाईलच्या यशानंतर आता Samsung कंपनीने A 51 नवीन मोबाईल आज लाँच होत आहे. या मोबाईलचे काय फीचर्स आहेत आणि किंमत जाणून घेऊया.

सॅमसंग गॅलेक्सी A51 मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी सुपर एमोलेड Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये रिझोल्युशन 1,080 x 2,400 पिक्सल आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ऑक्टाकोअर चिपसेटची सुविधा देण्यात आली आहे. 8 GB RAM128GB स्टोअरेजसह 512 जीबीपर्यंत तुम्हाला स्टोरेज मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येणार आहे.

या मोबाईलमध्ये तुम्हाला कॅमेऱ्याची क्लिअरिटीसोबत उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. शाओमी आणि ओपोच्या तुलनेत ह्याचा कॅमेरा रिअल कलर असणारे फोटो काढण्यास जास्त मदत करतो असा कंपनीचा दावा आहे. 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासोबत या फोनमध्ये 481255 असा चार प्रायमरी कॅमेरा असणारा मोबाईल आज भारतात लाँच होणार आहे. यासोबतच Li-Po 4000 mAh battery तुम्हाला मिळणार आहे.

हेही वाचा-Vodafone ची प्री-पेड ग्राहकांना ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

हा मोबाईल विवो S1 pro आणि opp F15 मोबाईला टक्कर देणार असल्याची चर्चा टेक्नोवर्ल्डमध्ये सुरू आहे. या मोबाईलसाठी सॅमसंग प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतात याची किंमत साधारण 25 हजारच्या आसपास असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यूएसबी टाइप-सी पोर्ट, 4 जी एलटीई, वाय-फाय आणि ब्लूटूथ मिळेल. फोन प्रिझम क्रश ब्लॅक, व्हाइट, ब्लू आणि पिंक कलर व्हेरिएंटमध्ये आला आहे.

हेही वाचा-4 दिवसांत बंद होणार या स्मार्टफोनमधील Whatsapp, कंपनीने घेतला मोठा निर्णय

First published: January 29, 2020, 10:42 AM IST

ताज्या बातम्या