आघाडीच्या स्मार्टफोन कंपनीपैकी एक असलेल्या सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी ए50 मोबाईलवर मोठी सूट दिली आहे. सध्याच्या किंमतीवर तब्बल 4 हजार 500 रुपयांचा डिस्काउंट कंपनीकडून दिला जात असल्याचं एका टेक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजच्या मोबाईलवर हा डिस्काउंट असल्याची माहिती देण्यात आली आहे. फोनच्या 4 जीबी रॅमच्या मॉडेलच्या किंमतीवर कोणताही डिस्काउंट नाही. तसेच ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे.
ए50 मॉडेलची किंमत 17 हजार 499 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या फोनची बॅटरी 4000mAh असून AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा फोन लाँच केला होता.
6.4 इंचाचा डिस्प्ले असलेला हा फोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅममध्ये उपलब्ध आहे. तसेच 512 जीबी पर्यंत वाढवता येणारी मेमरी आहे. अँड्रॉइड पाय व्हर्जनवर चालणारा ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे.
तीन कॅमेऱ्यांचा सेटअप या फोनमध्ये आहे. 25 मेगापिस्केल फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगा पिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. त्याशिवाय फिंगरप्रिंट सेन्सरसुद्धा यामध्ये आहे. 6 जीबी रॅमच्या फोनची किंमत 21 हजार 490 रुपये होती. आता डिस्काउंटनंतर हा फोन 16 हजार 990 रुपयांत मिळणार आहे.
सावधान! PAN कार्डबाबत एका चुकीने होऊ शकतो 10 हजार रुपये दंड