मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

...तर तुमचा डेटा डिलीट होईल; Samsung युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

...तर तुमचा डेटा डिलीट होईल; Samsung युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

कंपनीने आपली इमेज बॅकअप सर्विस (Samsung Image Backup Service) बंद केली आहे, जो सध्या सॅमसंग क्लाउडचा भाग आहे. त्यामुळे कंपनीने एक निवेदन जारी करुन युजर्सला त्यांचे फोटो क्लाउड स्टोरेजमधून हटवण्याची विनंती केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : जर तुम्ही सॅमसंग युजर (Samsung User) असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. Samsung Galaxy युजर्सला कंपनीच्या क्लाउड स्टोरेजमधून आपले फोटो मायग्रेट करण्यासाठी पॉप-अप नोटिफिकेशन मिळत आहे. त्याशिवाय कंपनीने एक निवेदन जारी करुन युजर्सला त्यांचे फोटो क्लाउड स्टोरेजमधून हटवण्याची विनंती केली आहे. जर युजरने हे पालन केलं नाही, तर ठराविक कालावधीनंतर फोटो काढून टाकले जातील. कंपनीने आपली इमेज बॅकअप सर्विस (Samsung Image Backup Service) बंद केली आहे, जो सध्या सॅमसंग क्लाउडचा भाग आहे.

कंपनीने आधी दिलेल्या एका निवेदनानुसार, 30 सप्टेंबर 2021 पासून गॅलरी सिंक आणि माय फाइल्ससाठी ड्राइव्ह स्टोरेज आता सॅमसंग क्लाउडद्वारा सपोर्ट करणार नाही आणि युजरचा डेटा हटवला जाईल. त्याशिवाय युजरकडे जर प्रीमियम स्टोरेज सब्स्क्रिप्शन प्लॅन असेल, तर तो रद्द होईल आणि रिफंड केलं जाईल.

Samsung Cloud Storage मध्ये कॉन्टॅक्ट, कॅलेंडर आणि फोटोचा बॅकअप घेतला जातो. परंतु कंपनीने क्लाउड स्टोरेज सप्लाय बंद करण्याचा निर्णय घेतला आणि युजर्सला आधी क्लाउडमध्ये सेव्ह केलेले फोटो डाउनलोड करण्यास सांगितले.

Online fraud आणि QR Code फसवणुकीपासून असा करा बचाव, या गोष्टी ठरतील फायदेशीर

तुमचा डेटा कसा सुरक्षित ठेवाल?

30 सप्टेंबर 2021 पासून युजर्स OneDrive ला डिव्हाईसच्या गॅलरीशी आपोआप डेटा ट्रान्सफर सपोर्टशिवाय सॅमसंग क्लाउडशी लिंक करू शकतात.

Download my data मेन्यू युजरला क्लाउड डेटा डाउनलोड करण्याची परवानगी देतो. Gallery > More > Settings > Download content from cloud अशी प्रोसेस करता येते. गॅलरी डेटा किंवा ड्राइव्ह डेटा पर्याय निवडल्यानंतर डाउनलोड बटणावर क्लिक केल्यावरच डाउनलोड सुरू होईल.

सॅमसंग फोनमधून फोटो डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी सेटिंग ओपन करा आणि सॅमसंग क्लाउड सर्च करा. त्यानंतर Download My Data, Sync Apps, Backup Data, Data Restore आणि Delete Backup सारखे पर्याय दिसतील. यातील पहिल्या पर्यायाची निवड करा, त्यानंतर सर्व फोटो डाउनलोड होतील.

Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'

जर युजरने OneDrive अकाउंटशी कनेक्ट केलं असेल, तर ते Microsoft च्या क्लाउड स्टोरेजमध्ये आपल्या फोटोचा बॅकअप घेऊ शकतात. यासाठी 5GB स्पेस फ्री असेल, त्यानंतर स्टोरेजचा वापर करण्यासाठी पैसे भरावे लागतील.

First published:

Tags: Samsung, Tech news