11,000 रुपयांनी स्वस्त मिळताहेत Samsungचे ‘हे’ स्मार्टफोन; फक्त थोडेच दिवस मिळणार सवलत

11,000 रुपयांनी स्वस्त मिळताहेत Samsungचे ‘हे’ स्मार्टफोन; फक्त थोडेच दिवस मिळणार सवलत

सॅमसंगच्या Galaxy A9 ची विशेषता त्याच्या कॅमेऱ्यात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : Samsung कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. Samsung Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) हे दोन फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. Samsung A7 चं 4GB व्हेरिएंट 15,900 रुपयाला, तर 6GBचं व्हेरिएंट 19,900 रुपयाला तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल.

Samsung A9(2018) बद्दल सांगायचं झालं तर याचं 6GB128GB व्हेरिएंट ज्याची मुळ किंमत 28,990 रुपये आहे ते तुम्हाला 25,990 रुपयांत खरेदी करता येईल. तर याच मोबाइलचं 8GB 128GB हे व्हेरिएंट ज्याची मुळ किंमत 31,990 रुपये आहे ते तुम्हाला 28,990 रुपयात खरेदी करता येईल. सॅमसंगचा A9 हा फोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा त्याची किंमत 36,990 रुपये होती.  याचाच अर्थ सॅमसंगचं 6GB हे व्हेरिएंट तुम्हाला 11 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. ही ऑफर फक्त 31 मे पर्यंतच असल्याचं सॅमसंगने म्हटलं आहे.

गुगल सांगतं - भारतीय लोक लग्नासाठी कमी आणि डेटिंगसाठी जास्त उत्सुक

Samsung Galaxy A7 (2018) चे फीचर्स – या फोनमध्ये 6 इंचाचा FHD Super AMOLED इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं पिक्सेल रिझोल्यूशन 1080 x 2220 असं आहे. हा फोन 2.2 GHz ऑक्टाकोर 7885 प्रोसेसरवर काम करतो. कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर, या फोनच्या कॅमेऱ्याने वाइड एँगल फ्रेममध्ये तुम्ही फोटो काढू शकाल. रियर कॅमेरा सेटअपमध्ये 24 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही या फोनद्वारे स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्डीगसुद्धा करू शकता. या फोनचा फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा आहे.

Samsung Galaxy A9 ये फीचर्स – या फोनमध्ये 6.3 इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 या प्रोसेसरवर हा फोन काम करतो.  या फोनमध्ये अँड्रॉइड 8.1 ओरियो ही OS असून 3800 mAh ची बॅटरी त्यात बसवण्यात आली आहे. यात तुम्ही एकाच वेळेस 320 मुव्हीज स्टोअर करू शकता. Galaxy A9 ची विशेषता म्हणजे यात 4 कॅमेरे आहेत. रियरमध्ये 24MP चा प्रायमरी, 10MP चा टेलीफोटो लेंससह 2X ऑप्टिकल झूम, आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड 120 डिग्री लेंस आणि डेप्थ इफेक्टसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाइलचा फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा आहे.

First published: May 11, 2019, 3:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading