Home /News /technology /

ISRO: इस्रोच्या अध्यक्षपदी आता एस सोमनाथ! त्यांच्याविषयी 'या' गोष्टी माहीत आहे का?

ISRO: इस्रोच्या अध्यक्षपदी आता एस सोमनाथ! त्यांच्याविषयी 'या' गोष्टी माहीत आहे का?

केंद्र सरकारने सोमनाथ (S somnath)यांची अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

    नवी दिल्ली, 12 जानेवारी : केंद्र सरकारने बुधवारी ज्येष्ठ रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ (S somnath) यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation) अध्यक्षपदी नियुक्ती केली. भारताच्या सर्वात शक्तिशाली अंतराळ रॉकेट GSLV Mk-3 लाँचरच्या विकास कार्याचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये सोमनाथ यांची गणना केली जाते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल (PSLV) च्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या याच कार्याचा गौरव करत ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारने सोमनाथ यांची अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाच्या (Space Commission) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. याआधी ते 22 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) चे संचालक पदावर होते. ते आता इस्रोमध्ये के सिवन यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ या आठवड्यात शुक्रवारी संपत आहे. चीन आता अंतराळातही अमेरिकेला टक्कर देणार! काय आहे ड्रॅगनचा मास्टर प्लॅन? हे उल्लेखनीय आहे की एस सोमनाथ उच्च-दाब सेमी-क्रायोजेनिक इंजिनच्या विकास कामाचा एक भाग आहे. चांद्रयान-2 लँडरचे इंजिन विकसित करणे आणि GSAT-9 मध्ये बसवलेले इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीमचे उड्डाण यशस्वी करणे या यशातही त्यांचा वाटा आहे. सोमनाथ लाँच वाहनांसाठी डिझाइन सिस्टममध्ये तज्ञ आहेत. उपग्रह प्रक्षेपणासाठी जगभरात प्राधान्य असलेल्या पीएसएलव्हीचे इंटिग्रेशन डिझाइन तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. इस्रो म्हणजे काय? (What is ISRO?) इस्रो ही भारताची सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. त्याचे मुख्यालय कर्नाटक राज्यातील बेंगळुरूमध्ये आहे. अवकाश विज्ञान आणि ग्रह अन्वेषण संशोधन करताना राष्ट्रीय वाढीसाठी अंतराळ संशोधन विकसित करणे हे या संस्थेचे ध्येय आहे. ही जगातील सर्वात मोठ्या अंतराळ एजन्सींपैकी एक आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Science

    पुढील बातम्या