Home /News /technology /

Royal Enfield Himalayan आणि Meteor स्वस्त होणार? कंपनीने हे खास फीचर हटवलं

Royal Enfield Himalayan आणि Meteor स्वस्त होणार? कंपनीने हे खास फीचर हटवलं

रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीनं मीटियर (Meteor) आणि हिमालयन (Himalayan) या आपल्या लोकप्रिय बाईकमधलं ट्रिपर नेव्हिगेशन (Tripper navigation) हे स्टॅंडर्ड फीचर हटवण्याचा ठरवलं आहे.

नवी दिल्ली, 3 मे : तरुणाईमध्ये बुलेटची (Bullet) विशेष क्रेझ पाहायला मिळते. अन्य बाईकपेक्षा बुलेटची किंमत अधिक असते. किंमत जास्त असली तरी तरुणाईचा कल बुलेटकडे अधिक असतो. अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी बुलेटचा वापर साहसी पर्यटन, दुर्गम भागातलं पर्यटन आदींसाठी करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीदेखील बुलेट हा तरुणाईला उत्तम पर्याय वाटतो. त्यामुळे बुलेटप्रेमींसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ग्राहकांची गरज ओळखून बुलेटमध्ये अनेक फीचर्स (Features) देण्यात आली आहेत. प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं सातत्यानं फीचर्स अपडेट केली जातात. परंतु, रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीनं मीटियर (Meteor) आणि हिमालयन (Himalayan) या आपल्या लोकप्रिय बाईकमधलं ट्रिपर नेव्हिगेशन (Tripper navigation) हे स्टॅंडर्ड फीचर हटवण्याचा ठरवलं आहे. रॉयल एनफिल्ड बुलेटच्या नव्या मॉडेल्समध्ये अनेक लहान फीचर्स अपडेट करण्यावर सातत्याने भर देते. कंपनीनं मीटियर आणि हिमालयन या मॉडेलमधलं ट्रिपर नेव्हिगेशन हे फीचर हटवण्याचं ठरवलं आहे. क्रूझर आणि अ‍ॅडव्हेंचर टूरर बाइकच्या सर्व व्हेरियंटमध्ये हे फीचर देण्यात आलं होतं. या बाइक्समध्ये ट्रिपर नेव्हिगेशन फक्त रॉयल एनफिल्डच्या MIY कॉन्फिगरेटरद्वारे उपलब्ध असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑप्शनल अ‍ॅक्सेसरीज (Optional Accessories) म्हणून ग्राहक हे फीचर घेऊ शकतात. रॉयल एनफिल्डने फॅक्टरी बुकिंग मॉडेल्सच्या प्री-बुकिंग रकमेत (Pre-Booking Amount) वाढ करण्याचादेखील निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्राहकांना प्री-बुकिंगसाठी 10,000 रुपयांऐवजी 20,000 रुपये मोजावे लागणार आहे. परंतु, जुनं मॉडेल ग्राहकांना 10,000 रुपयांमध्ये बूक करता येणार आहे. बुकिंगच्या रकमेतला हा बदल 1 मे 2022 पासून लागू करण्यात आला आहे. कंपनीकडे सध्या बुलेट 350, क्लासिक 350, मेटॉर 350, हिमालयन, स्क्रॅम 411, इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 चे सात मॉडेल्स उपलब्ध आहेत. तसंच कंपनी काही नव्या मॉडेल्सवरदेखील काम करत आहे. त्यात 350 cc श्रेणीत हंटर 350 आणि नव्या जेन बुलेट 350 चा समावेश आहे. या मॉडेल्सची निर्मिती J सीरिज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणार आहे. तसंच 650 cc श्रेणीत सुपर मीटियर आणि शॉटगनसह अनेक नवीन मॉडेल्सदेखील कंपनी काम करत आहे. कंपनीनं मीटियर आणि हिमालयन या मॉडेलमधलं ट्रिपर नेव्हिगेशन हे फीचर हटवण्याचं ठरवलं आहे. परंतु, या निर्णयाबाबत स्पष्टता नाही. सेमीकंडक्टर चीपचा (Semiconductor Chip) तुटवडा भासत असल्याने कंपनीनं हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सध्या आहे. तज्ज्ञांच्या मते, हे फीचर हटवल्यानं त्याचा परिणाम या बाईकच्या किमतीवर होईल. यामुळे या बाईकच्या किमती 5000 रुपयांनी कमी होऊ शकतात. न्यू-जनरेशन क्लासिक 350 आणि स्क्रॅम 411 सारख्या मॉडेल्सवर सुरुवातीपासूनच ट्रिपर नेव्हिगेशन हे फीचर ऑप्शनल अ‍ॅक्सेसिरीज स्वरुपात दिलं जात आहे.

हे वाचा - Tata च्या Car मध्ये Tesla सारखे फीचर्स, विना ड्रायव्हर चालेल कार; पाहा कसं करेल काम

ट्रिपर नेव्हिगेशन हे फीचर रायडर्ससाठी खूप उपयुक्त होतं. ब्लुटूथच्या मदतीनं हे फीचर स्मार्टफोनशी कनेक्ट करता येतं. त्यानंतर ट्रिपर पॉड रायडरला टर्न-बाय- टर्न (Turn-By-Turn) नेव्हिगेशन दाखवतो. रॉयल एनफिल्ड कंपनीनं नुकतेच मीटियर 350 या मॉडेल्ससाठी तीन नव्या कलरचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यात न्यू फायरबॉल मॅट ग्रीन हा एक नवीन कलर असून तो मॅट-फिनिश ग्रीन फ्युएल टॅंकवर दिला जातो. या रंगाशी सुसंगत साईट पॅनेल स्टिकर्स आणि अ‍ॅलॉयवर ग्रीन रिम टॅप देण्यात आले आहेत. टॅंकवर फायरबॉल ब्लू हा अधिक गडद, व्हायब्रंट आणि ग्लॉसी फिनिश असेल. टॅंकवरचे पिवळ्या रंगाचे बॅजिंग आणि साईड पॅनेलवरचे पिवळे स्टिकर तसंच टायर रिम टॅप हे एकमेकांशी सुसंगत आहेत. दुसरीकडे सुपरनोव्हा रेड ड्युअल टोन प्रीमियम रिगल रेड आणि ब्लॅक कलर फ्युएल टॅंक आणि मॅचिंग साइड पॅनेलसह उपलब्ध आहेत. रॉयल एनफिल्ड मीटियर 350 च्या वैशिष्ट्यांचा विचार करता, या बुलेटमध्ये 349cc एयर-कूल्ड सिंगल सिलेंडर BS6 कंप्लायंट इंजिन देण्यात आलं आहे. यातून 20.5 hpची पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट होऊ शकतो. इंजिनमध्ये 5 स्पीड गियरबॉक्स आहेत. या बुलेटमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आलं आहे. या अ‍ॅपच्या मदतीनं रायडर आपला स्मार्टफोन बाईकशी कनेक्ट करु शकेल, तसेच त्याला कंट्रोलदेखील करता येईल. फोनशी नेव्हिगेशन कनेक्ट करून तुम्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता. मीटीयर 350 मध्ये डिजिटल अ‍ॅनलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (Analog instrument cluster) देण्यात आलं आहे. यामध्ये रायडरला गिअरची पोझिशन, ऑडोमीटर, फ्युएल गेज, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमाइंडरसारखी फीचर्स पाहता येतील. सुरक्षेसाठी या बुलेटमध्ये ड्युयल चॅनेल एबीएस, दोन शॉक अ‍ॅबसॉर्बर्स, एलईडी डीआरएल (DRL) असलेले गोलाकार हॅलोजन हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि 41mm टेलिस्कोपिक फॉर्क्स आहेत. लांबच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून ही बुलेट डिझाईन करण्यात आली आहे. बुलेटवर दोन जण अगदी सहजपणे बसू शकतील याप्रमाणे सीटची रचना करण्यात आली आहे. तसेच या बुलेटला बॅकरेस्टही देण्यात आला आहे. अशी दमदार गाडी स्वस्त झाली तर ग्राहकांना आनंद तर नक्कीच होईल. तुम्हीही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर बुलेट बूक करू शकता
First published:

पुढील बातम्या