Royal Enfield ची नवी Himalyan लवकरच होणार लाँच, असा असेल लूक आणि फीचर्स

Royal Enfield ची नवी Himalyan लवकरच होणार लाँच, असा असेल लूक आणि फीचर्स

भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या या नव्या बाइक्समध्ये हिमालयन बीएस-6 सुद्धा असणार आहे.

  • Share this:

रॉयल एनफील्ड नवीन वर्षात काही नव्या दमदार बाइक लाँच करणार आहे. भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या या नव्या बाइक्समध्ये हिमालयन बीएस-6 सुद्धा असणार आहे. कंपनीने ट्विटर अकाउंटवरून Himalyan BS6 चा एक टीझर शेअर केला आहे. भारतात 1 एप्रिल 2020 पासून फक्त बीएस 6 वाहने विक्री केली जाणार आहेत. त्यामुळे रॉयल एनफील्डने त्यांच्या बाइक्स नव्या रुपात बाजारामध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने बाइकबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. मात्र ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये नवीन हिमालयन बाइक लाँच होणार असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये हिमालयन बाइकचे कोलाज तयार कऱण्यात आलं आहे. ते X आकारात आहे. कदाचित नव्या बाइकच्या नावात X शब्द असण्याची शक्यता आहे. व्हिडिओमध्ये बाइकबद्दल बिल्ट फॉर ऑल रोड्स अॅण्ड बिल्ट फॉर नो रोड, कमिंग सून असं म्हटलं आहे.

येत्या काही दिवसांत कंपनीकडून बाइक लाँच केली जाण्याची शक्यता आहे. या बाइकमध्ये काही बदल असेल की नाही याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, बीएस 6 Royal Enfield Himalayan च्या फ्रंट लूकमध्ये मोठे बदल असतील. आता यामध्ये नवीन राउंड हेडलाइट, उंच फेंडर आणि क्लिअर विंडस्क्रिन असेल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बाइकच्या बीएस 6 इंजिन अपडेट शिवाय कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

वाचा : Kwid आणि S-Presso ला टक्कर देण्यासाठी येत आहे Tata ची छोटी SUV

बीएस 6 मॉडेलमध्ये नवीन catalytic converter मिळणार आहे. बाइकची पॉवर कमी होण्याची शक्यता आहे. Royal Enfield Himalayan च्या बीएस-4 मॉडेलमध्ये 410cc चे सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड SOHC इंजिन मिळते. जे 24bhp पॉ़वरचे असून 32Nm टॉर्क जनरेट करते.

वाचा : फक्त 6,666 रुपयांच्या EMI मध्ये घरी घेऊन या JAWA पेराक!

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 7:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading