Home /News /technology /

Android मध्ये सांगितली मोठी त्रुटी, Google कडून मिळालं लाखो रुपयांचं बक्षिस

Android मध्ये सांगितली मोठी त्रुटी, Google कडून मिळालं लाखो रुपयांचं बक्षिस

Security engineer found bug in android google reward him with 5000 dollar. भारतातील एका तरुण सिक्योरिटी इंजिनियरला Google ने लाखो रुपये बक्षिस म्हणून दिले आहेत. हे बक्षिस Android प्लॅटफॉर्मवर गंभीर त्रुटी शोधल्याबद्दल देण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 15 डिसेंबर : भारतातील एका तरुण सिक्योरिटी इंजिनियरला Google ने लाखो रुपये बक्षिस म्हणून दिले आहेत. हे बक्षिस Android प्लॅटफॉर्मवर गंभीर त्रुटी शोधल्याबद्दल देण्यात आलं आहे. टेक कंपन्या बाउंटी प्रोग्राम करत असतात. या प्रोग्राममध्ये सॉफ्टवेअर किंवा वेबसाइटमध्ये त्रुटी शोधून दिल्यास मोठं बक्षिस दिलं जातं. अनेक भारतीय देखील या बाउंटी प्रोग्राममध्ये भाग घेत असतात. अनेकांनी मोठी बक्षिसही मिळवली आहेत. यावेळी Google कडून आसाममधील Rony Das या इंजिनियरला बक्षिस मिळालं आहे. The News Mill च्या रिपोर्टनुसार, Android प्लॅटफॉर्ममध्ये गंभीर त्रुटी शोधून दिल्यानंतर Google ने Rony Das ला 5000 डॉलर, जवळपास 3.5 लाख रुपये बक्षिस म्हणून दिले आहेत. Rony Das ला सिक्योरिटी रिसर्चमध्ये आवड आहे. त्याने Android Foreground Services मध्ये एका बगबाबत रिपोर्ट केलं होतं. या बगमुळे बँकिंग मालवेयर आणि हॅकर्स युजर्सचा डेटा हॅक करू शकत असल्याचा धोका होता. सिक्योरिटी रिसर्चर Rony Das ने याबाबत सर्वात आधी मे महिन्यात Google ला माहिती दिली. Google नेही ही बाब गंभीरतेने घेतली आणि ही बाब खरी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर Rony Das ला 5000 डॉलरचं बक्षिस दिलं.

  तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा

  मिळालेल्या माहितीनुसार, Rony Das एक सॉफ्टवेअर बनवत होता. त्यावेळी त्याला काही समस्यांचा सामना करावा लागला. ही समस्या दूर करताना त्याला या मोठ्या बगचा शोध लागला. याबाबत त्याने Google कडे मे महिन्यात रिपोर्ट केला होता. त्यानंतर कंपनीसोबत तो सतत माहिती एक्चचेंज करत होता. जवळपास 6 महिन्यांनंतर Google ने त्याला या बगचा शोध लावल्याबद्दल बक्षिस म्हणून 5000 डॉलर दिले. Rony Das एका कंपनीत सिक्योरिटी इंजिनियर म्हणून काम करतो. 2015 मध्ये बारावीत असतानाही त्याने गुवाहाटी यूनिव्हर्सिटीच्या वेबसाइटमध्ये सिक्योरिटी त्रुटी शोधून काढली होती.

  टेलिकॉम कंपन्यांच्या सततच्या कॉलचा वैताग आलाय? अशी अ‍ॅक्टिवेट करा DND सर्विस

  काय आहे बाउंटी प्रोग्राम? टेक्नोलॉजी कंपन्या बाउंटी प्रोग्रामचं आयोजन करत असतात. या बाउंटी प्रोग्राममध्ये एखाद्या युजरने, एखाद्या त्रुटीचा रिपोर्ट कंपनीला सब्मिट केला आणि ती त्रुटी खरोखरचं असल्याचं कंपनीला आढळलं, तर त्या युजरला बक्षिस दिलं जातं. यालाच बाउंटी प्रोग्राम म्हणतात. बाउंटी प्रोग्राममध्ये एखाद्या बग बदद्ल किंवा त्रुटीबदद्ल कंपनीला सांगावं लागतं आणि त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर कंपनी ठरवते की ती त्रुटी किती गंभीर आहे. एखाद्याने सांगितलेली त्रुटी किंवा बगची गंभीरता पाहून बक्षिसाची रक्कम ठरवली जाते. भारतात यापूर्वीही फेसबुक आणि इतर कंपन्यांकडून लोकांना बक्षिस दिलं गेलं आहे. फेसबुकवर बग शोधून बक्षिस मिळवणाऱ्यांमध्ये भारतीय डेव्हलपर किंवा हॅकर्स सर्वात पुढे आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या