Home /News /technology /

इलेक्ट्रिक वस्तूंची तिसरी पिन वाचवते तुमचा जीव; असं आहे मुख्य काम

इलेक्ट्रिक वस्तूंची तिसरी पिन वाचवते तुमचा जीव; असं आहे मुख्य काम

तुमच्या घरांमध्ये अनेक विद्युत उपकरणे असतील, त्या सर्वांना विजेशी जोडण्यासाठी त्यांना जोडलेले तीन पिन प्लग सॉकेटमध्ये लावावे लागतात. पण, प्लगला तीन पिन का असतात? याचा कधी विचार केला आहे का?

    मुंबई, 29 जुलै : तुम्ही तुमच्या घरांमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक विद्युत उपरकरणं वापरत असाल. यामध्ये एक गोष्ट तुमच्याही नजरेतून सुटली नसेल. ती म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांचे प्लग त्यांच्या वापरासाठी सॉकेटमध्ये लावता तेव्हा ते सहसा तीन पिनचे असतात. बहुतेक इलेक्ट्रिकल प्लगमध्ये तीन पिन असतात. पण, तुमच्याकडे असलेल्या सर्वच विद्युत उपकरणांना तीन पीन असेलच असं नाही. काही वस्तू फक्त दोन पिनच्याच असतात. असं का? याचा कधी विचार केला आहे का? एखादी पिन जर कधी खोलून पाहिली तर लक्षात येईल की त्याच्या तीन पिनमध्ये तीन तारा जोडलेल्या आहेत. या तीन पिनपैकी दोन पिनचा आकार समान आणि सारखा असतो. मात्र, तिसरी पिन या दोन पिनपेक्षा थोडी जाड असते. ही पिन सहसा हिरव्या वायरला जोडलेली असते. या वायरला अर्थ वायर म्हणतात. प्लगमधील या तिसऱ्या पिनचे कार्य काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? सामान्य परिस्थितीत तिसऱ्या पिनमधून आणि हिरव्या वायरमधून कोणताही विद्युतप्रवाह वाहत नाही. या वायरचे एक टोक तुम्ही वापरत असलेल्या विद्युत उपकरणाला जोडलेले असते. आणि प्रत्येक रंगाच्या वायरसह पिन प्लगद्वारे पॉइंटला जोडलेला असतो, तो त्यास अर्थिंग किंवा पृथ्वीशी जोडतो. त्याला इलेक्ट्रिक ग्राउंडिंग देखील म्हणतात. तेव्हा विजेचा धक्का बसतो काहीवेळा असे होते की विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होतो, त्यानंतर या उपकरणात विद्युत प्रवाह वाहू लागतो. अशा परिस्थितीत जर कोणी त्या उपकरणाला स्पर्श केला तर त्याला विजेचा धक्का बसतो. विद्युत शॉकची तीव्रता मानवी शरीरातून किती विद्युत प्रवाह वाहते यावर अवलंबून असते. जर त्याचे हात ओले असतील तर शरीरातून अधिक विद्युत प्रवाह वाहतो. याचे कारण म्हणजे कोरड्या त्वचेपेक्षा ओली त्वचा ही वीजवाहक असते आणि अशा स्थितीत व्यक्तीला भयंकर धक्का बसतो. यामुळे त्याचा मृत्यूही होऊ शकतो. Smartphone Battery: स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप झालाय कमी? अशा प्रकारे वाढवा बॅटरीचं आयुष्य थर्ड पिनद्वारे अर्थिंगचे काम तिसऱ्या पिनचा वापर किंवा अर्थिंग ही अशी पद्धत आहे जी सदोष उपकरणांपासून विजेच्या धक्क्यांपासून संरक्षण प्रदान करते. सर्व मेन पॉवरच्या उपकरणांसाठी हे खूप महत्वाचे आहे की ते पृथ्वीशी योग्यरित्या जोडलेले आहेत, प्लगचा तिसरा पिन हेच कार्य करतो. त्यामुळे विजेचा धक्का लागणार नाही पॉवरच्या तिसर्‍या पिनद्वारे जर अर्थिंग योग्य प्रकारे केले जात असेल, तर विद्युत उपकरणे बिघडल्याने आपल्या शरीरात विद्युत प्रवाह वाहू लागला, तरी ते फारसे धोकादायक ठरणार नाही किंवा धक्का बसणार नाही. अशाप्रकारे, पॉवर प्लगचा तिसरा पिन तुम्हाला सर्वात जास्त संरक्षण देणारा असतो.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Electricity

    पुढील बातम्या