Elec-widget

चीनमधल्या 'या' मानवरहित बँकेत रोबो करतात सगळी कामं

जगात अशा प्रकारची 'ही' पहिलीच बँक असल्याचा चीनने केला दावा

  • Share this:

चायना कन्स्ट्रक्शन बँकेने (CCB) नुकतीच मानवरहित 'सेल्फ सर्व्हिस' शाखा शांघाय येथे सुरू केली. जगात अशा प्रकारची ही पहिलीच बँक असल्याचा दावा चीनने केला आहे.

या बँकेत ना कोणी मॅनेजर आहे, ना कोणता क्लार्क. या बँकेत कॅशियरसुद्धा नाही. या बँकेतली सर्व कामे ही फेशियल रिकग्निशन, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी या टेक्नॉलॉजीवर पार पडतात.

बँकिंग क्षेत्रात प्रथमच हा प्रयोग केला जात असल्याचा दावा 'सीसीबी' बँकेने केला आहे. 'सीसीबी'ने चीनमधील 360 शाखांमध्ये 1600 स्मार्ट मशिन्स लावल्या आहेत.

Loading...

शांघायमधल्या या बँकेत पाऊल टाकताच एक रोबोट मित्रत्वाच्या अंदाजात तुमचं स्वगत करतो आणि व्हॉईस रिकग्निशनच्या सहाय्याने ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो.

बँकेच्या काउंटरवर असलेले रोबोट ग्राहकांचे खाते उघडणे, पैसे ट्रान्सफर करणे, फॉरेन एक्सचेंज, गोल्ड इन्व्हेस्टमेंट अशा विविध बँकिंग सेवा देतात.

मोठ्या ग्राहकांसाठी या बँकेत विशेष दालनं तयार करण्यात आली असून, त्यात व्हिडिओकॉलिंगद्वारे बँकेच्या मॅनेजरशी ते थेट संपर्क साधू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 03:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com